शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सारोळा कासार सोसायटीच्या ३ संचालकांचे पद रद्द : शिक्षक नेते संजय धामणे यांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 16:59 IST

नगर तालुक्यातील सारोळा कासार सोसायटीच्या २ संचालकांनी कर्जाची परतफेड वेळेत केली नाही म्हणून तर एका संचालकाने कुठल्याही स्वरूपाचे कर्ज घेतलेले नसल्याने प्राप्त झालेल्या तक्रारींवरून या ३ संचालकांचे पद रद्द करण्याची कारवाई नगर तालुका उपनिबंधक आर. बी. कुलकर्णी यांनी केली आहे. यामध्ये शिक्षक नेते संजय आप्पासाहेब धामणे यांच्यासह २ माजी व्हाईस चेअरमनचा समावेश आहे.

केडगाव : नगर तालुक्यातील सारोळा कासार सोसायटीच्या २ संचालकांनी कर्जाची परतफेड वेळेत केली नाही म्हणून तर एका संचालकाने कुठल्याही स्वरूपाचे कर्ज घेतलेले नसल्याने प्राप्त झालेल्या तक्रारींवरून या ३ संचालकांचे पद रद्द करण्याची कारवाई नगर तालुका उपनिबंधक आर. बी. कुलकर्णी यांनी केली आहे. यामध्ये शिक्षक नेते संजय आप्पासाहेब धामणे यांच्यासह २ माजी व्हाईस चेअरमनचा समावेश आहे.सोसायटीतील सत्ताधारी रविंद्र कडूस गटाचे संचालक आणिमाजी व्हाईस चेअरमन अरुण भिकाजी जाधव हे संस्थेचे अनेक वर्षापासुनचे सभासद आहेत. मात्र सध्या त्यांच्या नावावर गावात जमीन नाही, तसेच त्यांनी कुठल्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नाही आणि ते सध्या गावात रहिवाशी नसल्याने त्यांचे पद रद्द करण्याबाबतची तक्रार विरोधी गटातर्फे करण्यात आली होती. या तक्रारी नंतर अरुण जाधव यांनीही विरोधी गटाचे संचालक शिक्षक नेते संजय धामणे व माजी व्हाईस चेअरमनच अनिता दिगंबर धामणे यांनी सलग दोन वर्षे अल्प व मध्यम मुदत कर्ज वेळेत भरलेले नसून तशी नोंद संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालात झालेली असल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ क अ (१)(एक)(ब) आणि महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ चे नियम ५८ नुसार पदावर राहण्यास अपात्र ठरत असल्याने त्यांचे पद रद्द करण्याची तक्रार केली.या दोन्ही तक्रारी स्विकारत तालुका उपनिबंधक आर.बी.कुलकर्णी यांनी त्यावर रीतसर सुनावण्या घेतल्या. संचालक संजय धामणे व अनिता धामणे यांनी तक्रार ही राजकीय हेतूने केली आहे. तसेच तक्रार दाखल झाल्यावर २ मे रोजी सर्व थकबाकी भरली असल्याचा बचावाचा युक्तिवाद केला. मात्र तक्रारदार अरुण जाधव यांच्या वतीने अ‍ॅड. प्रसन्ना जोशी यांनी हा बचाव खोडून काढत या दोघांनी तक्रार दाखल झाल्यावर थकबाकी भरली आहे म्हणजे थकबाकीदार असल्याचे मान्य केले आहे. कलम ७३ क अ मध्ये थकीत रक्कम भरल्यानंतर अपात्रता होत नाही असे कुठेही नमूद नाही. त्यांनी स्पष्टपणे तरतुदींचे उल्लंघन केलेले आहे, संस्थेच्या लेखापरीक्षण अहवालातही त्यांची नावे थकबाकीदार यादीत आहेत. त्यामुळे ते संचालक म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यासोबत अशा प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निकालाचा संदर्भही त्यांनी दिला. त्यांचा हा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून तसेच तक्रारदाराने सादर केलेले पुरावे, संस्थेच्या सचिवांनी मार्च २०१८ अखेर पर्यंत दोघे थकबाकीदार होते, २ मे रोजी थकबाकी भरल्याचा दिलेला अहवाल पाहून उपनिबंधक कुलकर्णी यांनी दोघांचेही संचालक पद रद्द केले आहे. त्यामुळे त्यांना पुढील ६ वर्ष सहकारी संस्थेची कुठलीही निवडणूक लढवता येणार नसल्याचे अ‍ॅड. प्रसन्ना जोशी यांनी सांगितले.दुस-या प्रकरणात संचालक अरुण जाधव हे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ११ आणि संस्थेच्या नमूद उपविधी ६(३) व ४(१४)(४) अन्वये सभासदत्वासाठी आवश्यक त्या पात्रता धारण करीत नसल्याने त्यांचे नाव संस्थेच्या सभासद नोंदवहीतून १ महिन्याच्या आत कमी करण्याचे आदेश सोसायटीला दिले आहेत. सारोळा कासार सोसायटीच्या इतिहासात असा प्रकारे संचालक पद रद्द होणे आणि तेही एकाच वेळी तिघांचे ही पहिलीच घटना असल्याने गावच्या परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर