शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सोन्याच्या २९ पिशव्या गायब

By मिलिंदकुमार साळवे | Updated: September 12, 2017 22:08 IST

गणोरे (ता. अकोले) येथील साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील सव्वा पाच कोटी रुपयांचा अपहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर या पतसंस्थेत सहकाराचा ‘स्वाहाकार’ कसा झाला? याच्या सुरस कथा समोर येऊ लागल्या आहेत. सोनेतारण कर्ज खात्यातील सोन्याच्या तब्बल २९ पिशव्या गायब आहेत.

ठळक मुद्देसावळेराम दातीर पतसंस्थासोनेतारण कर्जखाते५८ लाखांचा अपहारपतसंस्थेचा स्वाहाकार

अहमदनगर : गणोरे (ता. अकोले) येथील साथी सावळेराम सखाराम दातीर पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेतील सव्वा पाच कोटी रुपयांचा अपहार ‘लोकमत’ने उघडकीस आणला. त्यानंतर या पतसंस्थेत सहकाराचा ‘स्वाहाकार’ कसा झाला? याच्या सुरस कथा समोर येऊ लागल्या आहेत. सोनेतारण कर्ज खात्यातील सोन्याच्या तब्बल २९ पिशव्या गायब आहेत.चार्टर्ड अकाऊंटंट सुविद्या सोमाणी यांच्या एस. एस. सोमाणी अँड असोसिएटस् चार्टर्ड अकाऊंटंट या फर्मने दातीर पतसंस्थेचे ३१ मार्च २०१७ अखेरचे लेखापरीक्षण केले. त्यातून संस्थेची आर्थिक आरोग्यपत्रिकाच बाहेर आली आहे. त्यानुसार पतसंस्थेचे आर्थिक स्वास्थ्य खराब होऊन संस्था कोमात गेल्याचे निदान झाले आहे. फक्त गणोरे व परिसर कार्यक्षेत्र असलेल्या या पतसंस्थेचे जेमतेम ८१९ सभासद आहेत. एवढासा जीव असलेल्या या पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत.  हे घोटाळे पाहून हजारो सभासद असलेल्या पतसंस्था व सहकारी बँकांचे पदाधिकारी देखील आश्चर्याने तोंडात बोटे घालू लागले आहेत.जिल्हा बँकेच्या गणोरे व हिवरगाव (ता. अकोले) या दोन बँक शाखांमध्ये असलेल्या पतसंस्थेच्या मुदतठेव खात्यातील ४ कोटी ६५ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापाठोपाठ पतसंस्थेच्या सोनेतारण कर्ज खात्यातही घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. २९ जणांच्या नावावर पतसंस्थेत सोनेतारण ठेऊन त्यांच्या नावाावर ५७ लाख ८७ हजार ३०२ रूपयांचे कर्ज वितरण करण्यात आले होते. सोनेतारण कर्ज खात्याची तपासणी केली असता सोन्याच्या तब्बल २९ पिशव्या हिशोब करताना कमी आढळून आल्या आहेत. त्यातून ५७ लाख ८७ हजार ३०२ रूपयांचा अपहार झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार १९९३ ते मे २०१६ दरम्यानचा हा व्यवहार आहे. पण २०१३ ते २०१६ या तीनच वर्षात सोनेतारण कर्ज खात्यात सर्वाधिक उलाढाल आहे.यांच्या नावावर आहे सोनेतारण कर्ज मुक्ता कैलास शिंदे, विजय भास्कर उदावंत, सुनील सुकदेव काळे, भाऊसाहेब पांडुरंग नाईकवाडी, रोहिणी लक्ष्मण दातीर, कुंडलिक रखमा आंबरे, संकेत संजय जाधव, निवृत्ती मुरलीधर आंबरे, गणेश निवृत्ती रेवगडे, सुनील गंगाधर आहेर, मिलिंद नारायण दातीर, आबासाहेब रघुनाथ भालेराव, किशोर गोरख आहेर, राजेंद्र काशिनाथ कदम, संतोष देवराम आंबरे, कमलाकर भास्कर भालेराव, सचिन मुरलीधर काळे, परवेज युनूस शेख, प्रदीप भाऊसाहेब आंबरे, शकुंतला पद्माकर फले, विशाल विठ्ठल काळे, संतोष शांताराम रंधे, सचिन मनोहर नवले, बाळासाहेब विश्वनाथ आंबरे, जमिर गुलाब मनियार, प्रवीण चिमाजी मालुंजकर यांच्या नावाने असलेल्या सोनेतारण कर्ज खाती असलेल्या सोन्याच्या २९ पिशव्या कमी आढळून आल्या आहेत. यातील किती नावे खरी व किती खोटी?, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.