शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

२८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 14:06 IST

राज्य सरकारने कर्जमाफीस पात्र शेतक-यांची तिसरी यादी प्रसिद्ध केली. मात्र लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकरण बंद आहे. त्यामुळे शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर जैसे थे असून, २८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र ठरले आहे. कोरोनाच्या संकटातून पुन्हा उभारी घेण्यासाठी भांडवल आणायचे कोठून? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. 

अहमदनगर : राज्य सरकारने कर्जमाफीस पात्र शेतक-यांची तिसरी यादी प्रसिद्ध केली. मात्र लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकरण बंद आहे. त्यामुळे शेतक-यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर जैसे थे असून, २८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र ठरले आहे. कोरोनाच्या संकटातून पुन्हा उभारी घेण्यासाठी भांडवल आणायचे कोठून? असा प्रश्न शेतक-यांसमोर आहे. राज्य सरकारने महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. सरकारने कर्जमाफीस पात्र शेतक-यांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या. मात्र तिसरी यादी प्रसिध्द करण्यापूर्वीच लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे ही यादी सरकारने थेट बँकांना पाठविली. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेला जिल्ह्यातील २६ हजार पात्र शेतक-यांची यादी प्राप्त झाली आहे. मागील दोन याद्यामध्ये नावे असलेल्या दोन हजार शेतक-यांना तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी मिळालेली नाही. कर्जमाफीस पात्र शेतक-यांची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण केले जाते. शेतक-यांनी बायोमेट्रिक मशीनवर अंगठा दिल्यानंतर शेतक-यांच्या कर्ज खात्यात कर्जाची रक्कम जमा होते. ही रक्कम  जमा झाल्यानंतर शेतकरी कर्जमुक्त होऊन पुन्हा नवीन कर्ज घेण्यास पात्र होतात. परंतु, सध्या लॉकडाऊन असल्याने सेतू केंद्रांवर गर्दी होईल, या भितीने सरकारने आधार प्रामाणिकरणाचे पोर्टल बंद केले आहे. त्यामुळे तिस-या यादीतील पात्र शेतक-यांचे आधार प्रामाणिकरण रखडले असून, हे शेतकरी नवीन कर्ज घेण्यास अपात्र ठरले आहेत. खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. शेतीची मशागत, खते बी-बियाणे, यासाठी शेतक-यांना वेळेवर कर्ज मिळणे जरुरीचे आहे. परंतु, कर्जमाफीची अंमलबजावणी सध्या बंद आहे. त्यामुळे मागील कर्जाचा डोंगर जैसे थे असल्याने बँका शेतक-यांना दारात उभ्या करत नाहीत. त्यात कोरोनामुळे लॉकडाऊन आहे़ सर्व व्यवहार बंद आहेत. बँका एकमेव पर्याय आहे. पण, कर्जमाफीची प्रक्रिया रखडल्याने बँकाही कर्ज देऊ शकत नसल्याने जिल्ह्यातील बळीराजा हवालदिल आहे. सरकारने याबाबत तातडीने निर्णय घेऊन कर्जमाफीचा निर्णय घेण्याची मागणी जिल्ह्यातून पुढे येत आहे.आतापर्यंत ५० टक्केच कर्ज पुरवठाएप्रिलअखेर जिल्हा सहकारी बँकेकडून ५०० कोटीहून अधिक खरीप पीक कर्जाचे वाटप होत असते. यंदा कर्जमाफीमुळे पात्र शेतक-यांची संख्या वाढली. पण, लॉकडाऊन आणि रखडलेल्या कर्जमाफीमुळे आतापर्यंत जिल्हा सहकारी बँकेकडून २५५ कोटींचेच कर्ज वाटप झाले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी