शहरं
Join us  
Trending Stories
1
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
2
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
3
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
4
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
5
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
6
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
7
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
8
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
9
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
10
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
11
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
12
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
13
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
14
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
15
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
16
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
17
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
18
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
19
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
20
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?

२६ विद्यार्थ्यांना विषबाधा

By admin | Updated: February 12, 2015 14:12 IST

तालुक्यातील चोंभूत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात माथेफिरूने विषारी औषध टाकल्याने या शाळेतील २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. दरम्यान या विद्यार्थ्यांवर अळकुटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे़

पारनेर : तालुक्यातील चोंभूत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत अज्ञात माथेफिरूने विषारी औषध टाकल्याने या शाळेतील २६ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा प्रकार बुधवारी सकाळी घडला. दरम्यान या विद्यार्थ्यांवर अळकुटी येथील रुग्णालयात उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे़पारनेर तालुक्यातील अळकुटीजवळ चोंभूत गाव आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत बुधवारी सकाळी शाळेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पाणी भरीत असताना पाण्याला वेगळाच वास येत असल्याचे मुख्याध्यापिका नंदा ठुबे व कुसुम ठुबे यांच्या लक्षात आले. लगेच भानुदास ठाणगे, शमशुद्दीन सय्यद, शिवराम डेरे या शिक्षकांनी पाण्याच्या टाकीची पाहणी केली असता विषारी औषधाची बाटली पाण्यात आढळून आली. व पाण्यावर तेलासारखे तवंग दिसले. याप्रकाराने शिक्षक हादरून गेले. त्या टाकीतील पाणी कोणी प्यायले का, अशी विचारणा शिक्षक करीत असतानाच अनेक मुलांना उलट्या, मळमळ व पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याचे त्यांच्या लक्षात आले. शिक्षकांनी तातडीने रुग्णवाहिका व इतर वाहने घेऊन विद्यार्थ्यांना अळकुटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉ. शिवाजी जाधव, डॉ. कोते यांनी तातडीने उपचार सुरू केले़ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान या घटनेचे वृत्त कळताच पारनेर पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, सदस्य डॉ. भास्कर शिरोळे, मधुकर उचाळे, गटशिक्षणाधिकारी के. एल. पटारे, विस्तार अधिकारी विनेश लाळगे यांनी तातडीने आरोग्ययंत्रणा व इतर यंत्रणांना सतर्क करून विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र मदत पथक तयार केले. या प्रकारामुळे चोंभूतसह तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात भानुदास ठाणगे यांनी फिर्याद दिली असून याप्रकरणी पाण्यात विषप्रयोग केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार्‍या माथेफिरुचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणी सभापती गणेश शेळके यांनी केली आहे.विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांची नावेअक्षदा गणेश बनसोडे,पूनम जालिंदर गाडेकर,समीक्षा संदीप पाडेकर,रोशन सुभाष माळी,ओंकार सोमनाथ कोल्हे,मोहन गजानन कोल्हे,आरती काशिनाथ माळी,गौरव पवन जाधव,अजिंक्य बाळू जमदाडे,वैभव मच्छिंद्र जमदाडे,ओंकार बबन जाधव,साक्षी सुनील जमदाडे,दौलत सोम कोळेकर,विशाल नवनाथ शेलार,संकेत संतोष खाडे,चैतन्य बाबासाहेब म्हस्के,आकाश उत्तम भालेराव,श्रेयस बबन कोल्हे,वैभव सोमनाथ कोल्हे,साहिल अंकुश गांडाळ,साहिल दिनकर पारखे,जय बाबुराव देवाडे,रोहित बाबाजी म्हस्के,पल्लवी संतोष भालेराव,सार्थक रमेश माळी,लखन बाळू जाधव़