शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दंश केलेला साप महिलेच्या कपड्यात २४ तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:50 IST

सापाने दंश केल्याने आदिवासी महिला रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार सुरू केले.

ठळक मुद्देमामेखेल येथील घटना : डॉक्टरांनी वाचविले प्राण

मच्छिंद्र देशमुखकोतूळ : सापाने दंश केल्याने आदिवासी महिला रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार सुरू केले. परंतु २४ तास उलटल्यानंतर रुग्णालयात तिच्या कपड्यातच साप आढळून आल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु डॉक्टरांच्या सतर्कतेमुळे ‘त्या’ महिलेचे प्राण वाचले. ही घटना संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर जवळील मामेखेल येथे घडली.मामेखेल गावातील इंदुबाई भास्कर करवंदे या १३ जून रोजी आपल्या नातेवाईकांकडे आंबेरसासाठी गेल्या. रात्री उशिरा त्या मामेखेलला परतल्या. मात्र १४ जूनला पहाटे चार वाजता त्यांच्या पोटात दुखायला लागले. श्वास मंदावला म्हणून दुचाकीने अकोले येथील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये पहाटे पाच वाजता दाखल केले. आंबेरस खाल्ल्याने पोट दुखते असे सांगितले. मात्र डॉ.भांडकोळी यांनी रुग्णाची लक्षणे पाहून विषारी साप चावल्याचे सांगितले. मात्र रूग्णाचे नातेवाईक ते मान्य करेनात. रूग्ण बेशुद्ध पडल्याने त्याला कृत्रिम श्वास सुरू केला. मन्यार सापाच्या दंशाचे उपचार सुरू केले. डॉक्टरांनी घरात सापाचा शोध घ्यायला सांगितले. घरालगत एक कवड्या साप सापडला़ तो नातेवाईकांनी दाखविला. डॉक्टरांनी तो बिनविषारी असल्याचे सांगितले. रविवारी १ जुलैला रूग्ण पूर्ण बरा झाल्याने त्यांना डॉक्टरांनी घरी सोडले.

१५ तासांनी महिला आली शुद्धीवर

मन्यारच्या लक्षणानुसार उपचार सुरू ठेवल्याने १५ तासांनी रूग्ण जरा शुद्धीवर आली. १५ जूनला पहाटे चार वाजता रुग्णाच्या मानेवर व तोंडावर अडीच ते तीन फुटाचा साप वळवळू लागल्याने रुग्णाने हातपाय आपटायला सुरुवात केली. हॉस्पिटलमधील इतर रुग्णांच्या ही बाब लक्षात आली. साप दिसल्याने रुग्णालयात एकच गोंधळ झाला. इतर रुग्ण भितीमुळे मोठमोठ्याने आरडाओरड करु लागले. प्रसंगावधान राखून डॉ. भांडकोळी यांनी अकोले येथील सर्पमित्र धनंजय मोहिते यांना बोलावून मन्यार जातीचा साप पकडला. चक्क चोवीस तास हा विषारी साप महिलेच्या अंगावरील नेसत्या कपड्यात बसून होता. मात्र डॉक्टरांच्या सजगपणामुळे इंदुबाईचे प्राण वाचले हे नक्की.माझ्याकडे पेशंट आंबेरस खाल्ल्याने पोट दुखते म्हणून आले. मात्र श्वास बंद होत चालला होता. पेशंट बेशुद्ध होते. रक्ताभिसरण संस्था कमकुवत झाली होती. यावरून ही मन्यार दंशाची लक्षणे दिसू लागली. उपचार सुरू ठेवले. चोवीस तासांनी मन्यार साप रुग्णाच्या कपड्यातून बाहेर आला. त्याला सर्प मित्रांनी पकडून सोडून दिले. साप चावल्याचे निदान झाल्याने योग्य उपचार करता आले. -डॉ. एम. के. भांडकोळी, अकोले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले