जामखेड : ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या जामखेड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमधील ३५ सदस्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्याने त्यांचे सदस्यत्व जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सदस्यत्व रद्द झाल्याने जामखेड तालुक्यात राजकीय खळबळ उडाली. ३५ पैकी २ महिला सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे अपील केले आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यानंतर ६ महिन्यात निवडून आलेल्या सदस्यांनी जात पडताळणी करुन प्रमाणपत्र निवडणूक विभागाकडे जमा करावी, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. अनेक सदस्यांनी जात पडताळणी केलीच नाही. त्यामुळे तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर सुनावणी घेतली. त्यानंतरही सदस्यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ३५ सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले.
२४ ग्रामपंचायतींचे सत्ताकारण धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2016 00:44 IST