शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा राज्यातील २२ मजूर वा-यावर; सात दिवसापासून प्रशासनाचे दुर्लक्ष      

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 13:54 IST

केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये मागील सात दिवसांपासून तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील २२ परप्रांतीय मजूर अडकले आहेत. परंतु संपर्क करुनही नगर तालुका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे या मजुरांपुढे गावी जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

      केडगाव : केडगाव परिसरातील मराठा नगरमध्ये मागील सात दिवसांपासून तेलंगणा राज्यातील वारंगल जिल्ह्यातील २२ परप्रांतीय मजूर अडकले आहेत. परंतु संपर्क करुनही नगर तालुका प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे या मजुरांपुढे गावी जायचे कसे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथून रविवारी (३ मे) तेलंगणा राज्यातील २२ मजूर पायी निघाले असल्याची माहिती देशपातळीवरील सामाजिक क्षेत्रात काम करणा-या संघटनेच्या स्थानिक पदाधिका-यांना समजली. त्यांनी या मजुरांच्या निवा-याची व भोजनाची सोय केली. केडगाव परिसरातील मराठा नगर येथे सध्या हे मजूर राहत आहेत. या कुटुंबियांना जेवणाचा शिधा दिला जात आहे. पालिकेच्या गळती होणाºया जलवाहिनीतून ते तहान भागवत आहेत. या कुटंबियांना मदत करणा-या स्थानिक कार्यकर्त्यांनी या कुटुंबियांना मदतीसाठी नगर तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. शेवटी नाईलाजास्तव तहसीलदारांना फोन केला तर त्यांनीही तो उचलला नाही. मेसेज टाकला तरी प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी शहर विभागाचे पोलीस अधिका-यांशी संपर्क करण्यात आला. त्यांनी मदतीसाठी पाठवतो असे सांगितले. परंतू सायंकाळपर्यंत कुणीही आले नव्हते. भाषा समजत नसल्याने अडचणीया मजुरांच्या कुटुंबांशी संपर्क साधला असता त्यांना मराठी व हिंदी या दोन्हीही भाषा समजत नाही. भाषेची अडचण असल्याने त्यांचे नोंदणी फॉर्म भरण्यापासून अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मदत मिळत नसल्याने तेलंगणा राज्यातील मजूर हतबल झाले आहेत. मजूर व सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींकडून प्रशासनाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या भागातील नागरिक तसेच सामाजिक संघटनेच्या तरुणांकडून या मजूर कुटुंबियांना शिधा व आहार पुरविला जात आहे. प्रशासनाकडून कधी प्रतिसाद मिळतो? याकडे मजुरांचे डोळे लागले आहेत.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार