शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
कबुतर जा...जा...जा..., की कबुतर आ...आ...आ...? दादरमध्ये तणाव; जैन समाजबांधव आक्रमक, पाेलिसांशीही झाला वाद
5
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
6
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
7
जुनी वह्या-पुस्तके परत द्या; पुनर्वापरातून परिवर्तनाकडे नेणार ‘ज्ञानपत्र योजना’ 
8
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
9
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
10
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
11
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
12
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
13
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
14
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
15
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
16
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
17
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
18
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
19
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
20
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका

२०३ गावात अंधार, ६२० घरांची पडझड

By admin | Updated: June 6, 2014 01:02 IST

अहमदनगर : वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा शहरासह जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला आहे़

अहमदनगर : वादळी वार्‍यासह झालेल्या पावसाचा शहरासह जिल्ह्याला जोरदार तडाखा बसला आहे़ वादळी वारे व विजेच्या कडकडाटामुळे विद्युत रोहित्रे नादुरुस्त होऊन वीज पुरवठा विस्कळीत झाला असून, मध्यवर्ती शहरासह जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात आहेत़ त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़शहरासह जिल्ह्यात सध्या तातडीचे भारनियमन लागू करण्यात आले आहे़ त्यामुळे रात्री-अपरात्री विद्युत पुरवठा खंडित केला जातो़ त्यात आता वादळी वार्‍यासह होणार्‍या पावसाचीही भर पडली आहे़ पहिल्याच पावसात महावितरणचे पितळ उघडे पडले असून, शहरासह जिल्हा अक्षरश: अंधारात चाचपडतो आहे़ पावसाळ्यापूर्वीच्या दुरुस्तीसाठी महावितरणने यापूर्वी अनेकवेळा विद्युत पुरवठा खंडित केला होता, हे विशेष़ दुरुस्तीचे काम होऊनही महावितरणची दाणादाण उडालीच़ वादळाने विद्युत खांब कोसळले़ काही ठिकाणी तारा तुटल्या़ त्यामुळे भर पावसात वीज गायब झाली़ त्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली़ मध्यवर्ती शहरातील विद्युतभवनमधील रोहित्र रात्री नऊ वाजेच्या सुमारास नादुरुस्त झाले़ मुळा धरणाकडे जाणारी वीज खंडित झाली़ वसंत टेकडीचे रोहित्रही बंद पडले़ परिणामी शहराचा पाणीपुरवठा ठप्प झाला़ वसंत टेकडी येथील रोहित्र सुरू करण्यात कर्मचार्‍यांना पहाटे चार वाजता यश आले़ त्यामुळे काही भागाला पाणी देणे शक्य झाले़ सावेडी उपनगरातील रोहित्र रात्री ८़ ३० वाजता नादुरुस्त झाले़ त्यामुळे शेंडी गाव रात्रभर अंधारात होते़ जिल्ह्यात तर यापेक्षाही भयावह स्थिती असून, जिल्ह्यातील २०३ गावे अंधारात आहेत़ग्रामीण भागात मोठ्याप्रमाणात भारनियमन सुरू आहे़ त्यात आता तातडीच्या भारनियमाची भर पडली़ त्यामुळे ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असतानाच वादळी वार्‍याने वाड्या -वस्त्यांवरील वीज अचानक गायब झाली़ काल बुधवारी झालेल्या पावसात जिल्ह्यातील एक हजार १०० विद्युत खांब कोसळले़ तारा तुटल्या असून, वीजपुरवठा खंडित झाला़ विद्युतपुरवठा खंडित झालेल्या गावांची माहिती घेऊन दुरुस्तीच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ बहुतांश रोहित्र विजेच्या कडकडाटाने नादुरुस्त झाले आहेत़ आकाशातून पडणार्‍या विजेचा दाब प्रचंड असल्याने रोहित्र नादुरुस्त होतात़ ते दुरुस्त करणे शक्य आहे़ परंतु खांब उभे करून तारा जोडणे, ही कामे करणे कठीण आहे़ परिणामी ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास आणखी काही दिवस लागतील,असे महावितरणकडून सांगण्यात आले आहे़(प्रतिनिधी)२९ लाखांचे नुकसानशहरासह जिल्ह्यात खांब व तारा तुटल्यामुळे महावितरणचे २९ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़ काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटामुळे रोहित्र नादुरुस्त झाले असून, ते दुरुस्त करण्याचा खर्चही मोठा असून, नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़सरकार तुमचेच़़़महावितरणवर आ़ राठोड यांचा मोर्चा आला असता काँग्रेसचे उबेद शेख तिथे आले़ त्यांनीही महावितरणवर नाराजी व्यक्त केली़ त्यावर राठोड म्हणाले, आम्ही विरोधात आहोत, परंतु सरकार तुमचेच आहे आणि तुम्हीच तक्रारी करता, अशी फिरकी राठोड यांनी यावेळी घेतली़ सरकार जरी आमचे असले तरी ते काहीच करत नाहीत़ काळ्या काचा खाली करत नाहीत, आपल्यालाच सर्व करावे लागते, अशी खंत शेख यांनी यावेळी व्यक्त केली़