शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार १७८ विहिरी अपूूर्ण

By admin | Updated: April 26, 2016 23:26 IST

अहमदनगर : ‘लोकमत’ने राज्यातील चार जिल्ह्यातील विविध योजनांमधील विहिरींचा ग्राऊंड रिपोर्ट मंगळवारी प्रसिद्ध केला. या वृत्तामुळे नगर जिल्ह्यातील रोजगार हमी विभागात दखल घेतली़

अहमदनगर : ‘लोकमत’ने राज्यातील चार जिल्ह्यातील विविध योजनांमधील विहिरींचा ग्राऊंड रिपोर्ट मंगळवारी प्रसिद्ध केला. या वृत्तामुळे नगर जिल्ह्यातील रोजगार हमी विभागात दखल घेतली़ जि. प. च्या रोजगार हमी विभागाने चालू आर्थिक वर्षातील पूर्ण-अपूर्ण विहिरींच्या कामाचा मंगळवारी आढावा घेतला. दरम्यान, नगरमधील २ हजार १७८ विहिरींची कामे अपूर्ण असल्याची माहिती रोहयो विभागाने दिली. जिल्ह्यात २०११-१२ पासून रोहयोतून ६ हजार ९५१ विहिरींच्या कामांना मंजुरी देण्यात आली. यातून प्रत्यक्षात ५ हजार ७८० कामे सुरू होवू शकली. यातील ३ हजार ६०२ कामे पूर्ण झाली असून २ हजार १७८ कामे अपूर्ण आहेत. अपूर्ण राहणारी कामे कुशल-अकुशल कामाच्या ६०-४० च्या प्रमाणात अडकलेली आहेत. केंद्र सरकारच्या रोहयो योजनेतून विहिरी खोदण्याच्या अध्यादेशात या विहिरींना कठडे बांधणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. काही तालुक्यात हे कठडे न बांधल्याने विहिरींची कामे अपूर्ण दिसत आहेत. तसेच अनेक विहिरींचे कामे अर्धवट झाल्याने तेथे माती पडून त्या विहिरी बुजल्या आहेत़ सरकारने २०१५-१६ मध्ये पुढील तीन वर्षात रोजगार हमी योजनेतून खोदण्यात येणाऱ्या विहिरींचे नियोजन केलेले आहे. यात २०१५-१६ मध्ये ६६७ विहिरी खोदण्याचे उद्दिष्ट असताना १ हजार ६५ विहिरी खोदण्यात आलेल्या आहेत. चालू वर्षात हे उद्दिष्ट ९२७ आहे. २०१२ पासून विहिरीसाठी १ लाख ९० हजार अनुदान होते. त्यानंतर हे अनुदान ३ लाख करण्यात आलेले आहे. ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानंतर नगर जिल्हा परिषदेला नागपूरहून तातडीने रोजगार हमी योजनेतंर्गत जिल्ह्यात झालेल्या विहिरींच्या कामाबाबत विचारणा झाली होती. (प्रतिनिधी)़़़तर विहिरींचे पुन्हा सर्वेक्षण जिल्ह्यात ‘रोहयो’तून मंजूर झालेल्या आणि खोदण्यात आलेल्या विहिरींची आणि लाभार्थ्यांची माहिती रोहयोच्या संकेतस्थळावर आॅनलाईन टाकण्यात आलेली आहे. जिल्ह्यात ९०० विहिरींची कामे कुशल-अकुशलच्या फेऱ्यात अडकलेली आहेत. त्यातून मार्ग काढण्यात येत असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. रोजगार हमी योजनेतून यापूर्वी कामे सुरू असणाऱ्या विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले असून वरिष्ठांनी सूचना दिल्यास पुन्हा सर्वेक्षण करण्यात येईल, अशी माहिती रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अजय धारस्कर यांनी दिली.