शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

२००६ पूर्वीची ईव्हीएम होणार नष्ट : निवडणूक आयोगाचा आदेश

By चंद्रकांत शेळके | Updated: August 31, 2019 13:09 IST

सन २००६ पूर्वीची एम १ श्रेणीची सर्व मतदान यंत्रे नष्ट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित मतदान यंत्र कंपन्यांना दिले आहेत.

चंद्रकांत शेळकेअहमदनगर : सन २००६ पूर्वीची एम १ श्रेणीची सर्व मतदान यंत्रे नष्ट करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित मतदान यंत्र कंपन्यांना दिले आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून गोडावूनमध्ये धूळखात पडलेल्या व सुरक्षेच्या कारणास्तव कोट्यवधींचा खर्च होणाऱ्या मतदान यंत्रांचा प्रश्न निकाली निघणार आहे.गेल्या पाच वर्षांपासून एम १ श्रेणीच्या मतदान यंत्रांचा वापर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाने बंद केला होता. २०१५नंतर ही ईव्हीएम पुन्हा वापरलेली नाहीत. ही मशीन्स आकाराने मोठी आणि सतत नादुरूस्त होत होती. व्हीव्हीपॅट यंत्रे आल्यानंतर एम१ ईव्हीएम कालबाह्य झाली. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून ही यंत्रे देशात, राज्यात त्या त्या जिल्हा प्रशासनाकडे पडून आहेत. मोठमोठ्या इमारतीत ही यंत्रे ठेवलीअसून त्याला कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. या बंदोबस्तावर शासनाचे कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. शिवाय शाळा, महामंडळांच्या इमारती यंत्रांसाठी अडकून पडल्या आहेत.अहमदनगरमध्ये एम१ श्रेणीची सुमारे आठ हजार यंत्रे असून ती केडगाव जिल्हा परिषद शाळेत गेल्या पाच वर्षांपासून पोलीस बंदोबस्तात आहेत. पुणे, ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांकडे ही जुनी यंत्रे सर्वाधिक आहेत.आयोगाने गत १९ आॅगस्टला या यंत्रांच्या उत्पादित कंपन्यांना यंत्रे नष्ट करण्याचे आदेश दिले. बँगलोर येथील भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड व तेलंगणा येथील इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन आॅॅफ इंडिया लिमिटेड या कंपन्यांनी ही ईव्हीएम उत्पादित केलेली आहेत. केंद्र आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या विहित ई-कचरा विघटनाच्या नियमांनुसार या यंत्रांची विल्हेवाट लावायची आहे.संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही मशीन्स नष्ट करायची असून त्याचे व्हीडीओ चित्रीकरण निवडणूक आयोगाला पाठवायचे आहे, असे आदेशात म्हटले आहे.राज्यात सुमारे २ लाख ईव्हीएमराज्यात सुमारे २ लाख एम १ श्रेणीतील ईव्हीएम असण्याची शक्यता आहे. या सर्व मशिन्सच्या देखभालीसाठी गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रूपयांचा खर्च शासनाने केला. त्यासाठी हजारो पोलीस कर्मचारी अडकून पडले.अखेर पाच वर्षांनंतर आयोगाने ही यंत्रे नष्ट करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सर्वच जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय