शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

१९५ प्रशिक्षणार्थी जवान सैन्यात दाखल : एमआयआरसीत प्रशिक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 16:57 IST

एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रात १९५ प्रशिक्षणार्थी जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला.

अहमदनगर : ‘बस इस ख्याल से जिंदा हू,कि तू हमारा है.जो तू ना रहा तो कुच नही है जीने मे,ए मेरे वतन तुझे धूप कैसे छुएगी,क्योंकी हजारो माँओ के आँचल है तेरे सीने मे’या दृढनिश्चयाने येथील एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रात १९५ प्रशिक्षणार्थी जवानांनी देशसेवेची शपथ घेत सैन्यात प्रवेश केला.मेकॅनाईज्ड इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटर (एमआरआरसी) ही देशातील प्रमुख सैन्य प्रशिक्षण संस्थांपैकी एक आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर प्राथमिक ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर हे जवान सैन्यात दाखल होतात. शनिवारी (दि. २१) एमआयआरसीत झालेल्या पासिंग आऊट परेडमध्ये सैनिकांनी शानदार संचलन करत उपस्थितांची मने जिंकली. अखौरा ड्रिल स्टेडियमवर झालेल्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मेजर जनरल अजय चौहान (व्हीएसएम) यांनी परेडचे निरीक्षण केले. तत्पूर्वी जवानांनी चौहान यांच्यासह एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रमण्यम (सेना मेडल) व कर्नल रसेल डिसुझा यांना सलामी दिली. त्यानंतर मेजर जनरल चौहान यांनी उघड्या जीपमधून परेडचे निरीक्षण केले. जवानांनी आपापल्या धर्मग्रंथावर हात ठेवत धर्मगुरूंकरून देशसेवेची शपथ घेतली.मेजर जनरल चौहान यांनी या सोहळ्याचे कौतूक करत जवानांना भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. सैन्यात भरती झाल्यानंतर प्रशिक्षणाचे हे पहिले पाऊल आता पूर्ण झाले आहे. अजून खूप मोठा टप्पा गाठायचा आहे. सैन्य जीवनात आपल्या कृतीने देशाचे, राज्याचे, युनिटचे, गावाचे नाव कसे उज्ज्वल होईल, याकडे लक्ष द्या. सैन्याचा गौरवपूर्ण इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करा. दृढनिश्चय, विश्वास व प्रामाणिकपणे देशाची सेवा करा. देशाबाहेरील, तसेच देशांतर्गत संकटापासून देशवासियांचे रक्षण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, याची आठवण नेहमी ठेवा, असे सांगत चौहान यांनी सैनिकांचा आत्मविश्वास वाढवला.उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुकया प्रशिक्षण काळात १९५ पैकी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या तीन प्रशिक्षणार्थी जवानांचा विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला. जनरल सुंदरजी सुवर्णपदक बलविंदर सिंह याला, जनरल के. एल. डिसुजा रौप्यपदक बलराज सिंह याला, तर जनरल पंकज जोशी कांस्य पदक गजेंद्र सिंह याला देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आपल्या पाल्यांना देशसेवेत सुपूर्द केल्याबद्दल या जवानांच्या पालकांचाही गौरवपदक देऊन सन्मान करण्यात आला. आपला मुलगा देशाचा भावी रक्षक असल्याचे समाधान पालकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर