शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

१८ टक्के विद्यार्थ्यांनी अडविली संचमान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट झाल्याशिवाय २०२०-२१ ची संचमान्यता मिळणार नसून जिल्ह्यात अद्याप १८ टक्के ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अपडेट झाल्याशिवाय २०२०-२१ ची संचमान्यता मिळणार नसून जिल्ह्यात अद्याप १८ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेशन बाकी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांमुळे संबंधित शाळांची संचमान्यता अडकली आहे. दरम्यान, आतापर्यंत ८२ टक्के विद्यार्थ्यांचे आधार अपडेट झाले आहे.

पुढील शैक्षणिक वर्षांत शिक्षक संचमान्यता देताना केवळ आधारकार्ड नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे आधारकार्ड नसेल तर तो विद्यार्थी शिक्षकांच्या संचमान्यतेसाठी उपयोगी ठरणार नाही. त्यातून शिक्षक पदे अतिरिक्त ठरण्याचा धोका आहे. यासंदर्भात शाळांनी विद्यार्थ्यांचे आधारकार्ड विद्यार्थी पोर्टलवर तात्काळ अपडेट करण्याचे आदेश मे महिन्यातच शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून शाळेची शिक्षक संचमान्यता ऑनलाईन् स्वरूपात होत आहे. त्यासाठी आतापर्यंत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती संकेतस्थळावर दिली जात होती. परंतु, आता प्रत्येक विद्यार्थ्याचे आधारकार्ड संचमान्यतेसाठी गृहीत धरले जाणार असल्याने शिक्षकांच्या, पर्यायी शाळांच्या अडचणी वाढल्या आहेत.

-------------

आधारकार्ड काढण्यासाठी शिक्षकांचीच पायपीट

विद्यार्थ्यांचे आधारकार्ड शिक्षकांच्या संचमान्यतेसाठी महत्त्वपूर्ण ठरल्याने अनेक शिक्षक वारंवार पालकांना आधारकार्ड काढण्याचे आवाहन करतात. मात्र, अनेक पालक ही बाब गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे पर्यायाने शिक्षकांनाच विद्यार्थ्यांना घेऊन आधारकार्ड काढण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक मुलांचे आधारकार्ड काढण्यासाठी आधार केंद्रावर दिसत आहेत.

---------------

जिल्ह्यातील शाळा (पहिली ते बारावी) -

विद्यार्थी - ९ लाख १४ हजार ७७६

आधार अपडेट झाले - ८२ टक्के

----------

पहिलीच्या अनेक विद्यार्थ्यांची रेशनकार्डमध्ये नावे नसतात. आधार केंद्र शहराच्या ठिकाणी असल्याने पालक विद्यार्थ्यांना गर्दीच्या ठिकाणी पाठवत नाहीत. अनेकांच्या आधारकार्ड व शाळेतील नावामध्ये तफावत आहे. अशा अनेक अडचणी आधारकार्ड अपडेशनमध्ये येत आहेत.

- किशोर जगताप, मुख्याध्यापक, धनगरवाडी, ता. राहाता

-------------

संचमान्यतेसाठी आधारकार्ड आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यात ८२ टक्के काम झालेले आहे. उर्वरित आधारकार्ड अपडेशनचे कामही लवकरच होईल.

- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक