लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नागापूर औद्योगिक वसाहतीतील इंटक कारखान्यातील कामगारांना १६ हजार ७५८ रुपयांची पगारवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखाना व्यवस्थापन व जिल्हा कामगार संघटनेत तसा करार झाला असून, त्यानुसार ही पगारवाढ करण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी दिली.
नागापूर औद्योगिक वसाहतीतील इंटक कारखाना व्यवस्थापन व जिल्हा कामगार संघटनेत कामगारांच्या वेतनाबाबत बुधवारी करार झाला. यावेळी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, कंपनीचे वरद राजन बालचंद्रन, प्रसन्ना आपटे, भूपेंद्र सिंग, राजेश पेवाल, कामगार प्रतिनिधी वैभव पादीर, महेश चेडे, गौतम मेटे, वैभव तोडमल, कासिम शेख, श्रीकृष्ण थोरात, हरिकृष्ण ढेरे, संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.
कारखाना व्यवस्थापनाबाबत झालेल्या कराराची लांडे यांनी माहिती दिली. ते म्हणाले, कारखान्याशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला. व्यवस्थापनाने कामगारांच्या वेतनात वाढ करण्याची तयारी दर्शविली. ही वाढ करताना मेडिकल इन्शुरन्समध्ये वाढ करून २ लाखांवरून ३ लाख करण्यात आली आहे. तसेच दिवाळी बोनस २५ हजार करण्यात आला. याचबरोबर २0१८-१९ मधील वाढीव बोनस म्हणून प्रत्येक कामगाराला १ हजार रुपये दिले जाणार आहेत. कामगारांना २७ सुट्ट्यांवरून ३५ सुट्ट्या करण्यात आल्या. कामगारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये दिले जातील.
...
फोटो: २४ बारस्कर नावाने आहे.
फोटो ओळी
नगर : अहमदनगर जिल्हा कामगार संघटना व इंटक कारखाना व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींमध्ये करार झाला. यावेळी मनपा विरोधीपक्ष नेते संपत बारस्कर, संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, कंपनीचे वरद राजन बालचंद्रन, प्रसन्ना आपटे, भूपेंद्र सिंग, राजेश पेवाल, कामगार प्रतिनिधी वैभव पादीर, महेश चेडे, गौतम मेटे, वैभव तोडमल, कासिम शेख, श्रीकृष्ण थोरात, हरिकृष्ण ढेरे, संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.