पर्यावरणाच्या संवर्धनाकरिता छात्रसैनिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा व दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक पाण्याच्या बॉटलचा वापर करावा. प्लास्टिक पिशवीऐवजी कापडी पिशवीचा वापर करावा व फावल्या वेळेत जनजागृती करावी, असे आवाहन कर्नल जीवन झेंडे यांनी केले.
या कार्यक्रमाची सुरुवात संजय चौधरी यांनी दादा पाटील महाविद्यालयापासून केली. या उपक्रमाचे कर्नल विनय बाली, कॅप्टन डॉ. सुरेश जाधव, कॅप्टन डॉ. गौतम केळकर, कॅप्टन डॉ. अजय कुमार पालवे, लेफ्टनंट प्राजक्ता भंडारी, लेफ्टनंट भरत डगडे, लेफ्टनंट महादेव जाधव, चीफ ऑफिसर भरत बालसिंग, चीफ ऑफिसर भाऊसाहेब शिंदे, मयूर भोसले, दिलीप कर्पे, प्रा. किसन सूळ, सुभेदार कुंदन, संचेदर सिंग, सुभेदार लोकंदर सिंग आदींनी स्वागत केले आहे.
--------
फोटो - ०३एनसीसी
१७ महाराष्ट्र बटालियन एनसीसी छात्रसैनिकांनी प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियान राबविण्यात सहभाग घेतला.