शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरप्रदेशातील १५५९ मजुरांची साईनगरीतून घरवापसी, तिसरी रेल्वे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 22:11 IST

शिर्डी : रोजगाराच्या निमीत्ताने शिर्डीसह राहाता तालुक्यातील चोवीस गावांत वास्तव्याला असलेल्या उत्तरप्रदेशातील १५५९ मजुरांची आज, मंगळवारी साईनगर रेल्वेस्थानकातुन घरवापसी करण्यात आली़ स्वगृही परतण्याचा आनंद या मजुरांच्या चेहºयावरून ओसंडून वाहत होता़

शिर्डी : रोजगाराच्या निमीत्ताने शिर्डीसह राहाता तालुक्यातील चोवीस गावांत वास्तव्याला असलेल्या उत्तरप्रदेशातील १५५९ मजुरांची आज, मंगळवारी साईनगर रेल्वेस्थानकातुन घरवापसी करण्यात आली़ स्वगृही परतण्याचा आनंद या मजुरांच्या चेहºयावरून ओसंडून वाहत होता़साईनगरीतुन उत्तरप्रदेशला जाणारी ही तीसरी रेल्वे असून या तिन्ही रेल्वे मिळून आतापर्यंत तालुक्यातील ४२१२ नागरीकांना उत्तरप्रदेशात स्वगृही पाठवण्यात आले आहे़आपल्या कुटूंबातील दुर जाणाºया एखाद्या व्यक्तीला निरोप द्यावा त्या प्रमाणे आपल्या गावी परतणाºया या मजूर बांधवाना साईनगर रेल्वे स्थानकावर रात्री दहाच्या सुमारास निरोप देण्यात आला़ यावेळी साईसंस्थानचे सीईओ अरुण डोंगरे, डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, नायब तहसीलदार सचिन म्हस्के, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर वाकचौरे, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले, मिथुन घुगे, रेल्वेचे स्थानक प्रमुख बी़एस़ प्रसाद, पोलीस निरीक्षक रामजी मिना, अनुप देशमुख यांच्यासह शंभरावर कर्मचारी यावेळी उपस्थीत होते़रेल्वे निघण्यापुर्वी मजुरांना संस्थानचे सीईओ अरूण डोंगरे यांच्या आदेशानुसार प्रसादालय प्रमुख विष्णु थोरात यांनी प्रसादालय कर्मचाºया मार्फत अन्नाची पाकिटे दिली़ यात भाजी, पोळी व मसाले भाताचा समावेश होता़गेले काही दिवस अत्यंत तणावात काढलेल्या या मजुरांनी रेल्वे निघण्यापुर्वी डोळ्यातील अश्रुंना वाट करून देत प्रशासन व साईसंस्थानला धन्यवाद दिले़  सर्व मजुर उत्तरप्रदेशातील ५४ शहरांतील आहेत़ या सर्वाना सितापुर रेल्वे स्थानकावर सोडण्यात येईल़ या मजुरांना गावी पाठवण्यासाठी तालुका प्रशासना बरोबरच २४ गावातील तलाठी, ग्रामसेवक, ५३ शिक्षक आदींनी परिश्रम घेतले़ मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली नियंत्रण कक्ष प्रमुख उर्मीला पाटील, संदीप नचित, वैशाली आव्हाड, चंद्रशेखर शितोळे आदींनी पाठपुरावा केला़---येथे काम करीत होते मजूरशिंगवे-४५२, नपावाडी-२११, बाभळेश्वर-५३, नांदुर्खी बु,-२, ममदापुर-३, लोणी खु,-१९, हसनापुर-३२, सावळेविहीर खु,-१, सावळेविहीर बु,-१५, रूई-३७, कोºहाळे- ६, पिंपळवाडी-८०, रांजणखोल-१९, धनगरवाडी-२८, निघोज-२५, कनकुरी-१२, पिंपळस-२०, साकुरी-६८, लोणी बु़-६४, पुणतांबा-२३, कोल्हार बु़-३४, राहाता-९४, निमगाव कोºहाळे ८७ व शिर्डी येथे १७४ मजूर काम करीत होते. हे सर्व मजूर आज रवाना झाले.