शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत लॉजमधून दीड लाखांची दारू जप्त

By admin | Updated: April 8, 2017 15:07 IST

शहरातील महामार्गालगत बस स्थानक परिसरातील कैलास लॉजवर छापा टाकून १ लाख, ६४ हजारांची देशी, विदेशी दारु जप्त करण्यात आली.

आॅनलाईन लोकमतपाथर्डी (अहमदनगर), दि़ ८- शहरातील महामार्गालगत बस स्थानक परिसरातील कैलास लॉजवर छापा टाकून १ लाख, ६४ हजारांची देशी, विदेशी दारु जप्त करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळीे सातच्या सुमारास पाथर्डी पोलिसांनी ही कारवाई केली. न्यायालयीन इमारतीनजीक असलेल्या लॉजवरील दारुसाठ्याविषयी पाथर्डी पोलिसांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेवाळे, सहाय्यक फौजदार गोर्डे, सहाय्यक फौजदार सुपारे, पोलीस हवालदार राजेंद्र पुंड, पो.कॉ शेंडे, पो.कॉ सानप, पो.कॉ घुगे, पो.कॉ शिंदे, पो.कॉ पठाण यांच्या पथकाने छापा टाकला. लॉजवरील व्यवस्थापक शहाराम रखमाजी बालवे (रा. बालवेवस्ती) यांच्याकडे पोलिसांनी विचारणा केली असता त्याने ग्राहकांना चोरून विक्री करण्यासाठी लॉजच्या तळमजल्यातील खोलीत दडवून ठेवलेला देशी, विदेशी दारूचा साठा दाखविला. त्यानंतर पोलिसांनी लॉज व्यवस्थापकास अटक करुन मोटारसायकल, मोबाईल असा एक लाख चौसष्ठ हजार, आठशे बासष्ठ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी हा दारूसाठा सील करून दारूचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. याबाबत पोलीस शिपाई अच्चुत चव्हाण यांनी मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई प्रमाणे गुन्हा नोंदविला. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना ताब्यात घेतले होते. परंतु एकाचविरुध्द गुन्हा दाखल केला.