शहरं
Join us  
Trending Stories
1
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशूंशी संवाद
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
5
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
6
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
9
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
10
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
11
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
12
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
13
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
14
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
15
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
19
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
20
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 

१४४ जागा, अन्यथा स्वबळावर निवडणुका!

By admin | Updated: July 5, 2014 00:33 IST

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर कार्यकर्त्यांनी २८८ जागा लढवण्याची तयारी ठेवावी, असा आदेश देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी

अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला १४४ जागा मिळाल्या नाहीत तर कार्यकर्त्यांनी २८८ जागा लढवण्याची तयारी ठेवावी, असा आदेश देतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘हिंमत असेल तर स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जा आणि जनतेचा कौल कोणाला आहे, हे जाणून घ्या’, असे आव्हान मित्रपक्ष काँग्रेससह भाजपा, सेना, मनसेला दिले आहे.जिल्हा राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यात शुक्रवारी उपमुख्यमंत्री पवार यांनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. पवार म्हणाले, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला काँग्रेस पेक्षा दुप्पट जागा मिळाल्या आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत आम्हाला निम्म्या जागा मिळाल्या पाहिजे. जर मायावती, मुलायम सिंग, जयललिता त्यांच्या राज्यात त्यांच्या विचारांचे सरकार आणू शकतात. तर महाराष्ट्रात शरद पवार यांच्या विचारांचे राज्य यावे, अशी इच्छा कार्यकर्त्यांनी बाळगली, यात वावगे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या वेळी स्वतंत्रपणे लढले, त्यावेळी राष्ट्रवादीच्या जागा वाढलेल्या आहेत. यामुळे एकदा काँग्रेस, भाजपा, सेना, मनसे यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवित जनतेचा कौल जाणून घ्यावा. निकालानंतर पाहिजे तर समविचारी पक्ष सत्तेवर येतील, असे ते म्हणाले. विरोधी पक्षाचा समाचार घेतांना पवार यांनी काँग्रेसला देखील चिमटे काढले. ‘मित्रपक्षाबद्दल न बोललेले बरे’ असा टोमणा मारत त्यांनी आपली नाराजी जाहीर केली. युतीच्या काळात करण्यात आलेल्या घोषणा, मनसेची लोकसभा निवडणुकीतील स्थिती, नाशिक महापालिकेत मनसेचा कारभार यावर कोणीच बोलण्यास तयार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादीचे वेगवेगळ्या पातळीवर चारित्र्यहनन सुरू आहे. एसआयटीने मला आणि सुनील तटकरे यांना क्लिन चिट दिलेली असतांना विरोधकांकडून जाणीवपूर्वक बदनामी सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. (प्रतिनिधी)कठोर निर्णय म्हणजे जनतेच्या खिशाला कात्री लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात ‘अच्छे दिन आनेवाले है’ असा प्रचार भाजपाकडून सुरू होता. निवडणुकीचा निकाल लागताच रेल्वे भाडे वाढ, पेट्रोल, डिझेल, गॅसचे दर वाढलेले आहेत. महागाई रोखण्यात मोदी सरकार अपयशी ठरत असतांना देशाच्या अर्थ व्यवस्थेसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात. कठोर निर्णय म्हणजे जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचेच काम ना? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.