शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

श्वानाला ११ फैरींची सलामी

By admin | Updated: May 18, 2016 23:59 IST

अहमदनगर : जबरी चोऱ्या, दरोड्यातील आरोपी थेट शोधणाऱ्या नगर जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील ‘संतोष’चा मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने मृत्यू झाला.

अहमदनगर : जबरी चोऱ्या, दरोड्यातील आरोपी थेट शोधणाऱ्या नगर जिल्हा पोलीस दलाच्या श्वान पथकातील ‘संतोष’चा मंगळवारी रात्री अल्पशा आजाराने मृत्यू झाला. बुधवारी दुपारी पोलीस मुख्यालयात त्याला अखेरची शोक सलामी देण्यात आली. अंत्यसंस्कारप्रसंगी पोलिसांचेही हृदय हेलावले.श्वान पथकातील ‘संतोष’ हा श्वान अनेक महिन्यांपासून आजारी होता. रेल्वे स्टेशन भागातील पशुचिकित्सालयात त्याला मंगळवारी उपचारासाठी दाखल केले असता तेथेच मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर बुधवारी दुपारी त्याच्यावर पोलीस मुख्यालयात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी त्याला सलामी दिली. संतोष या श्वानाचा जन्म ३० मार्च २०११ रोजी झाला होता. सोलापूर येथील कॅनॉल क्लब येथून तो तीन महिन्याचा असताना पोलीस दलाने त्याला विकत घेतले होते. त्यानंतर आधी नगर येथे सहा महिने आणि नंतर पुणे येथे नऊ महिने संतोषला प्रशिक्षण दिले. श्वान हस्तक असलेले सहायक फौजदार सुभाष गव्हाणे आणि पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब नरे यांनी त्याला प्रशिक्षित केले होते. पुणे येथील प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर २०१२ मध्ये संतोषला नगर जिल्हा पोलीस दलात सामावून घेण्यात आले होते. म्हणजे तब्बल पाच वर्षे त्याने पोलीस दलात सेवा दिली.गेल्या काही दिवसांपासून संतोष आजारी होता. त्याच्यावर उपचारही सुरू होते. उपचारादरम्यान मंगळवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवावर पोलीस मुख्यालयात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलीस दलाने ११ फैरी झाडून संतोषला मानवंदना दिली. यावेळी पोलीस उपअधीक्षक (गृह) आनंद भोईटे, उपअधीक्षक (शहर) बजरंग बनसोडे, कोतवाली पोलीस निरीक्षक सोमनाथ मालकर, मुख्यालयाचे सहायक निरीक्षक एस. आर. मंडलकर, राखीव पोलीस दलाचे निरीक्षक राशिनकर, पोलीस उपनिरीक्षक संदिपान बावळे, बॉम्बशोध पथक व पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते. २०१२ मध्ये श्रीगोंदा येथील जबरी चोरी व खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस संतोषने थेट पकडले होते. २०१३ मध्ये पाथर्डी येथील खून प्रकरणातील आरोपीस संतोषने थेट दाखविले. २०१४ मध्ये लिंपणगाव-श्रीगोंदा हद्दीतील खून प्रकरणातील आरोपीचा मागही यशस्वीपणे काढला. पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला ओळखण्यात संतोषची कामगिरी अव्वल ठरली. बेलवंडी येथील फसवणुकीच्या गुन्ह्यातील पतसंस्था चोरीतील १२ लाख रुपये व आरोपीचा थेट माग काढला होता.