शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत येथे १०१ छात्रसैनिकांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:17 IST

कर्जत : रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयातील मेजर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये १०१ ...

कर्जत : रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील महाविद्यालयातील मेजर संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली महारक्तदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये १०१ छात्रसैनिकांनी रक्तदान करून राज्य सरकारच्या आवाहनास प्रतिसाद दिल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या रक्तदान करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या रक्ताची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर रक्तदान करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देत कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयातील संरक्षण विभागामध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य सदस्य राजेंद्र फाळके, कॉलेज विकास समितीचे सदस्य बाप्पाजी धांडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन धांडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर, पंचायत समिती सदस्य दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

प्राचार्य बाळ कांबळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मेजर संजय चौधरी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. किसन सुळ, कॅडेट तुषार जगताप, किरण गोरे, ईश्वर राऊत, विशाल विटेकर, हरी नन्नवरे, रोहित धांडे, गीता नेवसे, अंजली शेटे, दीपाली गावडे, विजय जाधव, सयाजी जाधव, गजानन पखाले, प्रवीण फुंदे, अक्षय गरड, शुभम कदम आदींनी परिश्रम घेतले.