शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात २०५ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 17:10 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल ७५०५ अर्जांमधून २९४६ जणांनी माघार घेतली. यात १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. याशिवाय सर्व ग्रामपंचायतींमधून ३४९ सदस्यही बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ६३७, तर सदस्यांमधून ३५५० असे एकूण ४१८७ उमेदवार रिंगणात आहेत. ७ आॅक्टोबर रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.

अहमदनगर : जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेत बुधवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी दाखल ७५०५ अर्जांमधून २९४६ जणांनी माघार घेतली. यात १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. याशिवाय सर्व ग्रामपंचायतींमधून ३४९ सदस्यही बिनविरोध निवडले गेले. त्यामुळे आता सरपंचपदासाठी ६३७, तर सदस्यांमधून ३५५० असे एकूण ४१८७ उमेदवार रिंगणात आहेत. ७ आॅक्टोबर रोजी या ठिकाणी मतदान होत आहे.नोव्हेंबर ते डिसेंबर २०१७ या कालावधीत मुदत संपणाºया जिल्ह्यातील २०५ ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबर रोजी मतदान होत आहे. यावेळी पहिल्यांदाच सरपंचपद थेट जनतेतून निवडले जात आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी इच्छुकांची गर्दी वाढली आहे. सरपंचपदाच्या २०५ जागांसाठी १३२९ अर्ज आले होते. बुधवारी माघारीच्या दिवशी त्यातील जवळपास निम्म्या जणांनी (६९१) माघार घेतल्याने ६३७ जण रिंगणात आहेत.तसेच सदस्यांच्या एकूण १९४० जागांसाठी ६१७६ अर्ज आले होते. त्यातील २२५५ जणांनी माघार घेतल्याने आता ३५५० जण रिंगणात आहेत. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर पाच ग्रामपंचायतींमध्ये सर्व सदस्य बिनविरोध झाले, परंतु तेथे केवळ सरपंचपदासाठी लढत होत आहे.बिनविरोध ग्रामपंचायतीशिळवंडी (ता.अकोले), डोळासणे, कर्जुले पठार, रणखांब (ता. संगमनेर), वडगाव, भोजडे (ता. कोपरगाव), कमालपूर (ता. श्रीरामपूर), लोहगाव (ता. राहाता), ब्राम्हणगाव मांड (ता. राहुरी), म्हस्केवाडी (ता. पारनेर).सदस्य बिनविरोध, सरपंचांत लढतचिकणी, वडझरी, जांभूळवाडी (ता. संगमनेर), सुरेशनगर (ता. नेवासा), बनपिंप्री(ता. श्रीगोंदा) या ५ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य बिनविरोध झाले, परंतु येथे सरपंचपदासाठी लढत होत आहे.