शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’१४ परदेशींसह २३ जण निगेटिव्ह; नगरचे आणखी ४९ जण ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 09:16 IST

परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी उर्वरित ९ परदेशी व इतर असे २३ अहवाल प्राप्त झाले. सुदैर्वाने ते निगेटिव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले.

अहमदनगर : परदेशातून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोमवारी उर्वरित ९ परदेशी व इतर असे २३ अहवाल प्राप्त झाले. सुदैर्वाने ते निगेटिव्ह असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले. दरम्यान या दोघा कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात जामखेड, संगमनेर, राहुरी, नगर, नेवासा येथील ४९ व्यक्ती आल्या असून त्यांना ताब्यात घेतले आहे. यात नेवासे येथील काही परदेशी व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.काही दिवसांपूर्वी मॉरिशसमधून १४ परदेशी लोकांचा एक जमाव दिल्ली व तेथून १४ मार्च रोजी नगरला आला होता. त्यांचे नमुने जिल्हा रूग्णालयाने एनआयव्हीकडे पाठवले होते. त्यातील पाचजणांचे अहवाल रविवारी (दि. २९) प्राप्त झाले. त्यापैकी दोघा परदेशी व्यक्तींना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले, तर तिघांचा अहवाल निगेटिव्ह आला. उर्वरित ९ जणांचा अहवाल सोमवारी सायंकाळी प्राप्त झाला, तोही निगेटिव्ह असल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. याशिवाय इतर १४ जणांचा अहवालही सोमवारी निगेटिव्ह आला आहे.प्रशासनाने आता या परदेशी पाहुण्यांच्या संपकार्तील जिल्ह्यातील विविध भागातील माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. नेवासे, संगमनेर, राहुरी, जामखेड आदी ठिकाणाहून ४९ जणांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांचे घशातील स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत. नेवासे येथून ११ व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. यात काही परदेशातून आलेल्या नागरिकांचा समावेश आहे. या सर्व ४९ जणांचे स्त्राव नमुने आता चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.५२ अहवालाची प्रतीक्षादरम्यान, आतापर्यंत एकूण ३२५ जणांचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील २६२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर ५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यापैकी एकाचा १५ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला घरी सोडण्यात आले. अजून ५२ स्त्राव चाचणीचा अहवाल येणे बाकी असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी दिली.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टर