शिर्डी : शिर्डी पोलिसांनी शिर्डी शहरात मंगळवारी आरबीएल चौकात केलेल्या तपासणीत बेहिशोबी २ लाख ७० हजार रुपयांची रोकड पकडली. याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी माहिती दिली. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांचे सूचनेनुसार तसेच शिर्डी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आरबीएल चौकात लावलेल्या नाकाबंदीजवळ असताना एक महिंद्रा कंपनीची गाडी क्रमांक (एम.एच. १७, बी. डी. २३९०) या वाहनाची तपासणी केली. चालक किरण प्रभाकर डाडर (वय २६, रा. डिग्रस, रा. राहुरी) व त्यासोबत मनोज मोतीलाल बाफना (वय ३५) हे होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रक्कम तहसीलदारांकडे पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे.
शिर्डीत नाकाबंदीत २ लाख ७० हजाराची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 16:06 IST