शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आढळल्या १ लाख ४७ हजार मराठा-कुणबी नोंदी; १ कोटी दस्तऐवजांची तपासणी

By चंद्रकांत शेळके | Updated: December 11, 2023 20:45 IST

जिल्हा प्रशासनाचा अंतिम अहवाल नाशिक विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द

अहमदनगर: जिल्ह्यात मराठा-कुणबी संदर्भातील पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर महिनाभरापूर्वी सुरू झाली होती. या मोहिमेत सुमारे १ कोटी शासकीय दस्तऐवज तपासण्यात आले. यात जिल्ह्यात १ लाख ४७ हजार नोंदी मराठा व कुणबीचा संदर्भ असल्याबाबत आढळल्या असून त्याचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने नाशिक महसूल विभागीय कार्यालयाकडे दि. ८ डिसेंबरला सुपूर्द केला आहे.

मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली. नंतर या समितीची व्याप्ती संपूर्ण राज्यासाठी वाढविण्यात आली. त्यानुसार दि. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी जिल्ह्यात अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कक्ष स्थापन केला. त्यानंतर जिल्हा व तालुका स्तरावरील सर्व कार्यालयांमध्ये अभिलेख तपासणीची प्रक्रिया सुरू झाली.

तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालयाच्या स्तरावर पेरेपत्रक, कुळ नोंदवही, हक्क नोंद पत्रक, कोतवाल बुक नक्कल, टिपण बुक, योजना बुक, विविध कार्यालयातील जन्माचे दाखले, शैक्षणिक अभिलेख तपासणीची कार्यवाही युद्धपातळीवर सुरू झाली. यात १९६७ पूर्वीच्या सर्व नोंदी तपासण्यात आल्या. महिनाभराच्या कालावधीत या समितीने सुमारे १ कोटी शासकीय दस्तऐवज तपासले. यात १ लाख ४७ लाख मराठा कुणबीच्या नोंदी आढळल्या आहेत. त्याचा अंतिम अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी ८ डिसेंबर रोजी नाशिक विभागीय आयुक्तांकडे पाठवला. आता यावर शासनाच्या काय सूचना येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१ कोटी दस्तऐवजांची तपासणीमहसूलसह विविध शासकीय कर्मचाऱ्यांनी महिनाभरात सुमारे १ कोटी शासकीय दस्तऐवज तपासले. यात १ लाख ४७ हजार मराठा व कुणबी यांचा संदर्भ असलेल्या नोंदी आढळल्या आहेत. यात प्रामुख्याने सव्वा लाख नोंदी या जन्म-मृत्यूच्या आहेत. शिवाय प्राथमिक शाळेत आढळून आलेल्या नोंदींची संख्या १५ हजारांहून अधिक आहेत. जिल्हा प्रशासनाने यात महसूल अभिलेखे खसारा पत्रक, पाहणी पत्रक, कुळ नोंदवही, सातबारा उतारे, हक्क नोंद, जन्म-मृत्यू रजिस्टर, शैक्षणिक अभिलेखे, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडील अभिलेखे, कारागृह विभागाचे अभिलेखे, पोलिस विभागाच्या नोंदी, सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी खरेदी खत नोंदणी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी सैनिकांच्या नोंदी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या नोंदी या बाबींची तपासणी केली.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAhmednagarअहमदनगर