शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
2
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
3
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
4
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
5
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
6
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
7
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
8
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
9
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
10
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
11
भारतानंतर आणखी एक देश पाकिस्तानचे पाणी अडवणार, कुनार नदीवर धरण बांधण्याची तयारी सुरू
12
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
13
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?
14
बुध गुरु युती २०२५: बुध-गुरुचा शक्तिशाली नवपंचम राजयोग; 'या' ७ राशींचा सुखाचा काळ होणार सुरु
15
चंद्रशेखर बावनकुळेंची भाजपा कार्यकर्त्यांना तंबी; "सर्वांचे व्हॉट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर..."
16
मुलगा की मुलगी? नवजात अर्भकांच्या अदलाबदलीवरून दोन कुटुंबांमध्ये हॉस्पिटलमध्येच वाद
17
हेअर फॉलचा वैताग! लसूण की कांद्याचा रस... काळ्याभोर लांब, जाड केसांसाठी सर्वात बेस्ट काय?
18
भारतीय नौदल चीन, पाकिस्तान, तुर्कीला धक्का देणार! तीन पावले उचलली
19
लग्नानंतर तापसी पन्नूने सोडला देश? डेन्मार्कला शिफ्ट झाल्याच्या चर्चांवर अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
20
Numerology: ५, १४, २३ तारखेला जन्मलेल्या मुलींवर असतो बुधाचा प्रभाव; अत्यंत बुद्धिमान असतो स्वभाव!

ईश्वराची उपासना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:57 IST

भगवंतच या संपूर्ण दृश्य विश्वाचा निर्माता, त्राता आणि संहारकर्ता आहे, हे ज्ञानमार्गानेच कळते. चराचरात एक भगवंतच व्यापून आहे हे सत्य जेव्हा साधकाला जाणवते तेव्हाच त्याला ‘वासुदेव: सर्वामिति’ या भगवंत वचनाचा अनुभव येईल.

- वामन देशपांडेभगवंतच या संपूर्ण दृश्य विश्वाचा निर्माता, त्राता आणि संहारकर्ता आहे, हे ज्ञानमार्गानेच कळते. चराचरात एक भगवंतच व्यापून आहे हे सत्य जेव्हा साधकाला जाणवते तेव्हाच त्याला ‘वासुदेव: सर्वामिति’ या भगवंत वचनाचा अनुभव येईल. त्या दिव्य क्षणी त्याचे हे जगणे केवळ भगवंताच्या नामाने अक्षरश: सदैव झंकारत राहील आणि त्याचे अवघे अस्तित्व चंदनगंधी होईल...साधक भगताने आपल्या साधनेची धृवदिशा, भगवंत अस्तित्व हेच केवळ सत्य आहे, त्या विचाराशी स्थिर करून नामसाधनेत आपला प्रत्येक क्षण जर गुंफला तरच त्याला असा साक्षात्कार होईल की सर्वत्र जसे एक आकाशच पसरलेले आहे तसा सर्वत्र एक भगवंतच आहे. निर्गुण निराकार अवकाशव्यापी परमेश्वराची उपासना श्रेष्ठ मानणारे साधक भक्त विवेकाच्या साहाय्याने परमेश्वरी सान्निध्याचा अनुभव अष्टौप्रहर भोगत राहतील आणि सगुण साकार भगवंताची उपासना करणारे भक्तीहृदयी श्रेष्ठ भक्तीने भारलेल्या आपल्या सर्वांगाने परमेश्वरी सान्निध्याचा संवादी अनुभव भोगताना त्यांचे अवघे आनंदमय झालेले अस्तित्व म्हणजे आनंदाचा अक्षय तृप्तीचा डोह होईल. सत्यच सांगायचे झाले तर, ज्ञानमार्गी साधक भक्त, परमेश्वरी अस्तित्व आहे असे मानतो तर भक्तीमार्गी परमभक्त केवळ मानतच नाही तर तो परमेश्वरी अस्तित्वाचा प्रत्यक्ष अनुभव घेत राहतो. दोन्ही प्रकारच्या भक्तांच्या हृदयवीणा भगवंत नामातच सदैव झंकारत असतात. भक्ती दोघांचीही अतुटच असते. तरीही भगवंत आपल्या परमप्रिय भक्ताला आवर्जून एक रहस्य त्यासंदर्भात सांगतात की,ज्ञानी त्वामैव मे मतम।।पार्था, जो ज्ञानमार्गाने माझे अस्तित्व प्रत्यक्ष आनंदाने अनुभवतो, तो खरा भक्त असतो. कारण तो माझे स्वरूपच असतो. हे माझे मत तू प्रथम ध्यानात घे... कामनाविरहित, आसक्तीविरहित उपासना भगवंतांना अधिक प्रिय असते. भाग्याने लाभलेल्या या मानवी योगीचा आपण सदुपयोगच तर केला पाहिजे ना... विषयभोग हा मानवी योनीचा मूळत: उद्देशच नाही. तो विषयभोग इतर योनींसाठी आहे, हे साधक भक्ताने कायम लक्षात ठेवणे आवश्यक आहे. सर्वत्र एक परमेश्वरच गच्च भरून आहे, याचे भान फक्त मानवी योनीपाशी आहे. कारण माणसाला आपल्या बुद्धीचा वापर आत्मकल्याणासाठी करता येतो. इतर योनी परमेश्वरी अस्तित्वासंबंधी अनभिज्ञ आहे.

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक