शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रक्तात भिजलेले शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:47 IST

‘अशी पाऊले, या धरतीवर तिमिराचे पट भेदूनी उमटत गेली म्हणून पृथ्वी सूर्यकुळातून निखळून पडली नाही’ ख्रिस्ताच्या या बलिदानावर कविवर्य ...

‘अशी पाऊले, या धरतीवरतिमिराचे पट भेदूनी उमटत गेलीम्हणून पृथ्वी सूर्यकुळातून निखळून पडली नाही’ख्रिस्ताच्या या बलिदानावर कविवर्य कुसुमाग्रज यांनी केलेले भाष्य अगदी मार्मिक आहे. २००० वर्षांपूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताचे येरुसलेममधील कालवारी टेकडीवर महाबलिदान झाले! क्रुसावर अनंत यातनामध्ये असतानाही प्रभू ख्र्रिस्ताने मारेकऱ्यांना आणि जगातील साºया मानवांना उद्देशून म्हटले होते, ‘हे पित्या त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांनाच कळत नाही.’ इतिहासाच्या ताम्रपटावर आणि माणसाच्या काळजावर कोरले गेलेले हे रक्तरंजित शब्द अमर झाले आहेत. त्या शब्दांनी अनेकांना क्षमाशीलतेची प्रेरणा दिली आहे.उदाहरण द्यायचे तर हिटलरच्या छळछावणीत फादर मॅक्सी विल्यम कोलगे शिक्षा भोगत होते. या छळछावणीतील एका प्रापंचिकाला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. पत्नी व मुलाबाळांची आता पुनर्भेट होणार नाही या जाणिवेने तो ढसढसा रडू लागला. फादर मॅक्सी विल्यम यांना ही गोष्ट कळताच ते तुरुंगाधिकाºयाला म्हणाले, ‘या गृहस्थाऐवजी मला मृत्यूदंड द्या. कारण मी एक नि:संग फादर आहे.’ फादरांचा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि ते हसतहसत प्रभू येशूचे स्तवन करीत सुळावर गेले. मध्य प्रदेशात गोरगरिबांसाठी कार्य करणाºया केरळातील राणी मरिया नावाच्या सिस्टरची सावकारांनी भाडोत्री मारेकऱ्यांतर्फे हत्या केली. मारेकºयाला तुरुंगवास झाला. नंतर सिस्टरच्या बहिणीने रक्षाबंधनाला तुरुंगात जाऊन त्या मारेकºयाला राखी बांधून भाऊ मानले. तिच्या आईनेही त्याला मुलगा मानले. हे ऐकून तो मारेकरी ढसाढसा रडला. तुरुंगाधिकाºयांच्या परवानगीने तो सिस्टराच्या घरी गेला व त्याने सर्व नातेवाइकांची क्षमा मागितली तसेच यापुढे सद्वर्तनी जीवन जगण्याचे त्याने वचन दिले. ईश्वर अशी प्रेरणा आपल्या सगळ्यांना देवो, हाच गुडफ्रायडेचा संदेश!फा. फ्रान्सिस दिब्रिटो