शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आध्यात्मिकशिवाय प्रगती अशक्यच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 14:54 IST

मनुष्याने मानवी जीवनात इतरांना न दुखविण्यासाठी तसेच सत्यवचनी असण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

अध्यात्म मार्गावर चिकाटीने प्रगती करण्यासाठी आवश्यक असणारी संतुष्ट वृत्ती कायम करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत चारित्र्याचा मंचक प्रस्थापित केलाच पाहिजे. त्यामुळे मनुष्याने मानवी जीवनात इतरांना न दुखविण्यासाठी तसेच सत्यवचनी असण्याचा प्रयत्न केला पाहीजे.

जीवनात सत्यानंद ध्यानामुळे प्राप्त होतो हे सत्य आहे, आणि उच्च स्तरांवरील चैतन्य हा मानवाचा वारसा आहे हे ही सत्य आहे. तथापि, दहा यम आणि त्यांना अनुसरून दहा नियम यांची आपल्या सत्यानंदाची चेतना कायम राखण्यासाठी आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे कुठल्याही जन्मांत आपल्या स्वत:बद्दल आणि इतरांबद्दल उत्तम भावना असणेही आवश्यक आहे. हे यम आणि नियम आपले चारित्र्य घडवतात. चारित्र्य हे आध्यात्मिक प्रगतीचा पाया आहे. त्यामुळेच जेवढे आपण उच्च स्तरावर पोहोचू, तेवढेच आपण अधोगतीला जाणे शक्य आहे. आपल्या शरीरांतील वरची चक्रे गतीने फिरत असतात, तर खालची चक्रे अधिक गतीने भ्रमण करीत असतात. 

जीवनात  चारित्र्य घडवायला, यमनियमांप्रमाणे वागायला, लागलो की, जीवन सुखद आणि समृध्द होते. याउलट दुसºयांचे अहीत चिंतल्यास मनुष्य कदापीही सुखी राहू शकत नाही.  दुसºयाला दु:ख देणाºयाला वाईट परिणाम भोगावे लागतात. मानवी जीवनात वाईट परिणाम भोगावे लागतात. जीवनात वाईट आणि पुन्हा ते परिणाम भोगावे लागू नयेत. या आध्यात्मिक मार्गाच्या पायाशिवाय या मार्गावर प्रगति होणे, फळ मिळणे शक्य नाही. 

प्रत्येकाला बरेच स्वभावगुण असतात. स्वभावगुण ही एक सवय, एक सामान्य विचार करण्याची, बोलायची, वागायची पद्धत. बहुतेक सर्वांना या उत्कृष्ट (उत्साही, नियमीत,विश्वसनीय, दयाळु, प्रांजळ) आणि निकृष्ट गुणांचे मिश्रण असते. उत्तम चारित्र्य हे मानवी जीवनात सवोर्कृष्ट आभूषण मानले गेले असून,  चारित्र्य म्हणजे नेमके काय आहे? चारित्र्य हे प्रत्येकाच्या आपल्या मानसिक आणि नैतिक गुणांचा विशेष वैयक्तिक संचय आहे.  

आपण जे चारित्र्य घेऊन जन्माला येतो ते आपल्या पूर्वजन्मांच्या सर्व कर्माचे फळ आहे. काही लोक जन्मत:च स्पष्टपणे धार्मिक असतात, काही मिश्र स्वभावाचे असतात, तर इतर काही स्वार्थी आणि धूर्त असतात. तथापि, धर्म हे ही शिकवतो की आपण आपले जन्मत: असलेले गुण आपल्या स्वयंचिंतनाने आणि स्वप्रयत्नाने, आपण कसे विचार करतो आणि कसे वागतो यांचे स्वयं अवलोकन करून आणि त्यांवर नियंत्रण करून बदलू शकतो. आपल्या ज्या गुणाची वृद्धी करण्याची आकांक्षा आहे त्या गुणाबद्दल चिंतन केले आणि तो गुण प्रदर्शित केला तर तो गुण अधिक दृढ होईल.- ह.भ.प़ प्रभाकर सुतार महाराज,सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक