शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

श्रेष्ठता असे जेथे, देव पहावा तेथे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 19:42 IST

आपण राहतो त्या घराला ‘घर एक मंदिर समजत असू’ तर, घरातील मोठी माणसे या देवमूर्ती आहेत.

समाज जीवनात राहत असताना अनेक जण असे म्हणतात की, मी  नास्तिकवादी आहे. मी देव धर्म काहीच मानत नाही. या जगात देवच नाही, स्वामी विवेकानंद म्हणजे बालपणीचा नरेंद्र जगात देव आहे काय? या उत्तरासाठी सतत भटकत होता. प्रत्येकाला तो विचारत असे, ‘तुम्ही देव पाहिला काय?’ भेटणारे निरूत्तर होत. हाच प्रश्न रामकृष्ण परमहंसांना विचारला, रामकृष्ण म्हणाले, नरेंद्रा ! होय मी देव पाहीला. कोठे आहे देव? रानावनात, दºयाखोºयात, मंदिरात? भगवत गीतेत कृष्ण अर्जुनाला यादीच देतात. देव पहावा आकाशात चंद्र आणि सूर्य, पृथ्वीवर गंगा आणि हिमालय.ज्या-ज्या ठिकाणी श्रेष्ठता आहे, शील, सौदर्य आहे, कर्म सौदर्य आहे आणि सद्गुणांचा उत्कर्ष दिसून येतो तेथे देवाचे तेज प्रगट होते. परमेश्वर जरी सर्वत्र वसत असला तरी, त्याचा विचार राम, कृष्णात, ज्ञानदेव, विवेकानंद, शिवाजीच्या पूर्णत्वाच्या आदर्शात आहे, हे विसरून चालणार नाही. आपण राहतो त्या घराला ‘घर एक मंदिर समजत असू’ तर, घरातील मोठी माणसे या देवमूर्ती आहेत. हा भाव वर्धिष्णु करणे आवश्यक आहे. ज्या-ज्या ठायी चैतन्य दिसे, तेथे प्रभुचे रूप असे! हा संत विचार मोलाचा आहे. जे सगुण रूप आवडेल तो तो भगवंत जाणावा. ईश्वर एक आहे. त्याची विविध स्वरूपे आणि विविध प्रतिमा आहेत.राष्ट्रसंत म्हणतात धनुर्धारी झाला राम, मुरली धरता मेघश्याम...कटी कर ठेविता सगुण ब्रम्ह! विठ्ठल म्हणावी’

-हभप डॉ. ज्ञानेश्वर मिरगेशेगाव.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक