- सदगुरू श्री वामनराव पै आपल्याला सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे याऐवजी सुख हे पर्वताएवढे दु:ख जवाएवढे असे करायचे असेल तर हे करता येणे शक्य आहे का? तर हो हे करता येणे शक्य आहे पण यासाठी अखिल मानवजातीचा विचार करून प्रयत्न केले गेले पाहिजेत. पण आज अशी परिस्थिती नाही. आज माणसाला आपण सुखी असावे असे वाटते. तशी त्यांची इच्छा देखील असते व त्यासाठी माणूस प्रयत्नही करतो अगदी जन्मल्यापासून मरेपर्यंत तो त्यासाठी धडपड करतो तरीही त्याच्या वाटयाला दु:ख येते. याचे कारण याचा कुणी विचारच करत नाही. माणसाला असे वाटते की इतिहासाची पुर्नरावृत्ती होतच रहाणार. लोकांचा समजही असाच आहे की इतिहासाची पुर्नरावृती होतच रहाणार. लोक म्हणतात वामनराव याला काहीच उपाय नाही.जीवनविद्येला हे मुळीच मान्य नाही. जीवनविद्या असे सांगते की जिथे अपाय आहे तिथे उपाय हा असतोच. त्यामुळे या समस्येवर उपाय केला पाहिजे. माणूस हा प्राणीच उपाय करु शकेल कारण इतर प्राण्यांकडे ती बुध्दी नाही. इतर प्राणी आहार, निद्रा, भय, आणि मैथून यांच्या पलिकडे जात नाहीत. याच्या पलिकडे त्यांचे जग नाही.या चारांच्या पलिकडे इतर प्राणी जाऊ शकत नाही पण माणसाचे तसे नाही. माणूस या चारांच्या पलिकडे जावू शकतो व तो गेलेला देखील आहे. त्याने आतापार्यंत जे काही चमत्कार केलेले आहेत (मी हातचलाखीचे चमत्कार म्हणत नाही)विज्ञानाचे चमत्कार म्हणत आहे. कारण विज्ञानाचे चमत्कार वेगळे व बुवाबाबा करतात ते चमत्कार वेगळे. विज्ञानाने केलेले खरे चमत्कार जे आहेत ते डोळे दिपवून टाकणारे आहेत,मनाला चकित करणारे आहेत. माणसाच्या ठिकाणी जी बुध्दी आहे त्या बुध्दीच्या बळावर त्याने प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे. काही लोकांना प्रतिसृष्टी म्हणजे काय हे माहित नसेल. माणसाने प्रतिसृष्टी निर्मांण केली म्हणजे नेमके काय केले तर देवाने निर्माण केलेली सृष्टी म्हणजे डोंगर, नदया, झाडे, दगड, खनिजे वगैरे वगैरे पण हया सर्वांना एकत्र आणून माणसाने एक वेगळी सृष्टी निर्माण केली. उदाहरण दयायचे झाले तर घर अथवा इमारत बांधणे.परमेश्वराने जे काही निर्माण केलेले आहे ते माणूस एकत्र करतो व तो घर किंवा इमारत बांधतो. पण जर परमेश्वराने ते निर्मांणच केले नसते तर माणूसही काही करू शकला नसता.देवाने सृष्टी निर्माण केली व माणसाने प्रतिसृष्टी निर्माण केली. विमान हे माणसाने निर्माण केलेली प्रतिसृष्टी आहे. पूर्वी उडण्याचा अधिकार फक्त पक्ष्यांनाच होता पण आज विमानाच्या सहाय्याने माणूसही हवेत उडतो आहे. पंख लावून उडणारी माणसेही टी.व्ही त दाखविली जातात. माणसाने निर्माण केलेल्या हया प्रतिसृष्टीलाच आपण विज्ञान असे आपण म्हणतो. या विज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २३, जिथे अपाय आहे तिथे उपाय हा असतोच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2017 15:00 IST
आपल्याला सुख पहाता जवापाडे दु:ख पर्वताएवढे याऐवजी सुख हे पर्वताएवढे दु:ख जवाएवढे असे करायचे असेल तर हे करता येणे शक्य आहे का? तर हो हे करता येणे शक्य आहे पण यासाठी अखिल मानवजातीचा विचार करून प्रयत्न केले गेले पाहिजेत.
सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग २३, जिथे अपाय आहे तिथे उपाय हा असतोच
ठळक मुद्देमाणूस हा प्राणीच उपाय करु शकेल कारण इतर प्राण्यांकडे ती बुध्दी नाही.माणसाच्या ठिकाणी जी बुध्दी आहे त्या बुध्दीच्या बळावर त्याने प्रतिसृष्टी निर्माण केलेली आहे.प्रतिसृष्टीलाच आपण विज्ञान असे आपण म्हणतो. या विज्ञानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.