शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
5
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
6
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
7
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
8
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
9
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
11
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
12
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
13
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
14
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
15
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
16
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
17
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
18
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
19
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...

जेव्हा विकार उचल खातात, तेव्हा मनुष्य पशू होतो 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 19:46 IST

आज जितकी प्रगती आपणास दिसत आहे, तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही का..?

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

अध्यात्मशास्त्रात विकारांवर नियंत्रण ठेवण्याला खूप महत्त्व आहे. खरं तर, माणसाचे मन एक कुरूक्षेत्र आहे. त्यात विचारांचा आणि विकारांचा सतत संघर्ष चालू असतो. त्यातच विकार जास्त प्रमाणात उचल खातात व माणसाचा पशू होतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात-रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा। सांडी तू अवगुणू रे भ्रमरा॥  

कधी कधी विकार हे माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात. प्रश्न असा पडतो की, हे विकार कमी करण्याचा कांही उपाय नाही का..? तर भगवान रामकृष्ण परमहंस सुंदर दृष्टांत देत असत. लोखंडाची वस्तू खूप गंजलेली असेल तर लोह चुंबक तिला आकर्षित करू शकत नाही. वरचा गंज खरवडून काढला तरच ती लोखंडी वस्तू लोहचुंबकाकडे आकर्षित होते. ही विकार विवशता कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे मनुष्याने ईश्वरपरायण होणे. विकार कमी करण्याचे एकमेव साधन म्हणजे ईश्वरभक्ती आहे. आज विकार विवशतेने ग्रासलेल्या या जगाला अवकळा आली आहे. एखाद्या शेताकडे दुर्लक्ष व्हावे. पेरणीचा विसर पडावा. शेताची मशागत राहून जावी व काटेरी कुंपणाने शेत व्यापावे तसाच प्रकार आज समाजाचा झाला आहे. आज जितकी प्रगती आपणास दिसत आहे, तितकीच दिसणारी अधोगती खरी नाही का..? याचे कारण माणसात बळावलेली विकार विवशता हेच आहे.

गोकुळातील एक गोपिका भगवंताला आतूरतेने हाक मारीत असे. देवा... एकदा माझ्या हृदय मंदिरात ये ना..? तुला बघावयाला मी खूप आतूर आहे. देव तिला रोज येण्याचे आश्वासन देत होते, पण येत काही नव्हते. एक दिवस ती गोपबाला म्हणाली, देवा तुझे न येण्याचे कारण तरी सांग..? देव म्हणाले, तुझे हृदय मंदिर स्वच्छ कर, मगच मी येईल. ती गोपिका आपला स्वानुभव कथन करते...हरी या हो चला मंदिरी। कोणी नाही दुसरे घरी॥काम दादला गेला बाहेरी। क्रोध सासू ती नाही घरी॥देव हा माणसापासून दूर राहू नये आणि माणसं देवाजवळ जावीत, असं वाटंत असेल तर हे विकार निर्मूलन झालेच पाहिजे. फुले उमलतात, बहरतात, सुगंधाची उधळण करतात व वातावरणात परिमळ ठेवून जातात, तशीच विकाररहित माणसं सर्वांनाच प्रिय होतात..!

(लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा भ्रमणध्वनी 9421344960 )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक