शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

काय आहे महत्व; जाणून घ्या...क़ा करावी एकादशी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 13:00 IST

अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी

 संत ज्ञानेश्वर महाराजांनी ही प्रतिज्ञा केलेली आहे, संपूर्ण मनुष्य जीवाला सुखी करण्याची प्रतिज्ञा सोप्या,  सुलभ साधनेला डोळ्यासमोर ठेवून केलेली आहे. ती साधना म्हणजे पंढरीची वारी होय. या वारीतील नित्यनेम म्हणजे नामस्मरण व हरिपाठ आहे. या साधनेचे मुख्य व्रत एकादशी असून सर्व एकादशीमध्ये महत्त्वाची आषाढी एकादशी मानली जाते. कारण ही एकादशी पांडुरंगाला खूपच आवडणारी असून देवशयनी एकादशी असे म्हटले जाते.

चातुर्मासाला या ठिकाणाहून प्रारंभ होतो. सर्व साधक व भक्तमंडळी चातुर्मासामध्ये नित्यनेम व साधना मोठ्या प्रमाणात करतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये साधना खूपच गरजेची असून त्याचा हा मुख्य कालावधी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून व इतर प्रांतांमधून सुद्धा वारकरी भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला येतात. पंढरपूरमध्ये आल्यानंतर दशमीला चंद्रभागेचे स्नान करून पंढरी प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. लाखो भाविकांची या एकादशीला पंढरपूर मध्ये उपस्थिती असते. एकादशी हे व्रत असून ती अवस्था सुद्धा आहे. ‘ व्रत एकादशी करीन उपवाशी गाईन अहर्निशी मुखी नाम ’ वारकरी भाविकांच्या दृष्टीने एकादशी हे फक्त व्रत नसून ती एक उपासना आहे. म्हणून सर्व भाविक प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशी उपवासाने करतात.

एक दशा म्हणजेच एकादशी होय. अंत:करणाचा एकच विषय असणे, सर्व इंद्रियांचा एकच विषय असणे याला एकादशी म्हटले जाते. वारकºयांना वारीमध्ये व पंढरपुरात इतर काहीही दिसत नाही फक्त पांडुरंगच दिसतो. ‘ ऐका पंढरीचे महिमान राऊळ  तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण ते ही देव जाणावे’ हा भाव प्रत्येक भाविकांच्या मनामध्ये असतो.  म्हणूनच पंढरीमध्ये पोहोचल्यानंतर वारी पूर्ण केल्याचे समाधान प्रत्येकाला प्राप्त होते. एकादशी हा फक्त जीभेशी संबंधित विषय नसून तो सर्व इंद्रियांचा विषय आहे. अहर्निशी, सतत भजन,  नामस्मरण करणे म्हणजेच एकादशी हा अर्थ वारकरी संप्रदायामध्ये स्वीकारलेला आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे जीवन आनंदी होते.

जीवनामध्ये आनंद प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाचा खूपच अट्टाहास असतो, परंतु इतर प्रयत्नातून आनंदाची प्राप्ती होत नसल्यामुळे माऊलींनी सर्व जीवाला आनंदी बनवण्याची प्रतिज्ञा केलेली आहे. ‘किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी भजी जो आधी पुरूखी अखंडित’ मनुष्य देहातील जिवालाच आनंद प्राप्त करता येत असल्यामुळे त्याला वारी करण्याविषयी प्रवृत्त केले जाते. वारीतील सेवाभावातून नित्यनेम व एकादशी हे वृत्त वारकरी संप्रदायाने बंधनकारक सांगितलेले आहे.  लौकिकातील  एकादशीचा अर्थ आणि वारकरी संप्रदायातील एकादशीचा अर्थ पूर्णपणे वेगळा आहे. आषाढी एकादशीला सर्वच वारकरी पंढरपूरकडे आपल्या प्राणप्रिय विठुरायाला भेटण्यासाठी सर्व अडचणी बाजूला ठेवून निघतात. विवेक आणि श्रद्धेचा समन्वय म्हणजेच वारकरी होय. अशा सर्व वारकरी भाविकांना साष्टांग प्रणाम !- सुधाकर इंगळे महाराज

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशी