शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भरणी श्राद्ध करून मिळवा काशीला श्राद्ध केल्याचे पुण्य...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 12:50 IST

भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते.

भाद्रपद कृष्ण पक्षात म्हणजेच पितृपक्षात भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्याने गयेला जाऊन श्राद्ध केल्याचे फल मिळते. मृताच्या पहिल्यावर्षाच्या आत येणाºया भाद्रपदातील भरणी नक्षत्रावर मृतादि तिघांना धरून श्राद्ध करावे. पितृपक्षात जर मृताचे भरणी श्राद्ध केले नाही तर त्याची प्रेतत्वातून मुक्ती कशी बरे होईल, असा सवालही शास्त्रकारांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे भरणी नक्षत्रावर सपिंड श्राद्ध न केले तर तो मृतात्मा प्रेतत्वापासून कसा मुक्त होईल, असे शास्त्रकारांचे म्हणणे असल्याचे वेदशास्त्र संपन्न मंगेशगुरुजी ठोसर यांनी सांगितले.ज्यांना जिवंतपणी तीर्थयात्रा घडलेल्या नसतात, अशा व्यक्ती निधन पावल्यास त्यांना मातृगया, पितृगया, पुष्करतीर्थ, ब्रह्मकपाल इत्यादि तीर्थावरील श्राद्धांचे फळ मिळावे म्हणून भरणी श्राद्ध केले जाते. तसेच ज्यांना आपल्या पितरांना उद्देशून गयादि तीर्थांवर श्राद्धे करण्याची इच्छा असते. परंतु आर्थिक क्षमता व वेळ यांच्या अभावी ते करता येणे शक्य नसल्यासही भरणी श्राद्ध करतात. दरवर्षी भरणी श्राद्ध करावे, असे शास्त्रकार सांगतात. वास्तविक पाहता पुरातन काळी पितृपक्षामध्ये सर्वच दिवस श्राद्ध करण्याचा प्रघात असल्यामुळे त्यात भरणी श्राद्ध होतच होते. परंतु कालौघात पितृपक्षात मृताच्या फक्त तिथीच्या दिवशीच श्राद्ध करण्याची प्रथा पडल्यामुळे भरणी श्राद्धाबाबत वेगळा विचार करणे भाग पडत आहे. भरणी श्राद्धात पिंडाचा निषेध सांगितलेला आहे. तो प्रथम वर्षानंतर दुसºया वर्षापासून दरवर्षी भरणी श्राद्धासंबंधी समजावा, असे शास्त्रकार सांगतात. भरणी श्राद्ध मृताच्या पहिल्या वर्षी करावे की दुसºया वर्षीपासून करावे, याबाबत देशभरातील विद्वानांमध्ये मतभिन्नता आढळते. अनेक ठिकाणी तर दरवर्षी भरणी श्राद्ध अवश्य करावे, परंतु पहिल्या वर्षी बिलकूलच करू नये, असे सांगितले जाते. तर काही ठिकाणी पहिल्या वर्षी अवश्य करावे व नंतर इच्छा असल्यास दरवर्षी करावे, असे म्हटले जाते. त्यामुळे सांप्रत हे भरणी श्राद्ध कधी करावे आणि कधी करू नये, याबाबत भाविकांनी देशकालानुसार निर्णय घ्यावा, असे सांगून ठेवलेले आहे.काहींच्या मते तर भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघा नक्षत्रादि श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसºया वर्षीपासून करावीत, असे म्हणतात. नित्य तर्पणातदेखील मृत व्यक्तीला पितृत्वाचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये, असे म्हटले जाते.

श्राद्धाचा स्वयंपाक कोणी करावा?श्राद्ध तसेच पक्षाचा स्वयंपाक कोणी करावा, याबाबत शास्त्राने स्पष्टपणे सांगितलेले आहे. श्राद्धमंजिरी या पुस्तकात याचे सविस्तर विवेचन आलेले आहे. शक्य असेल तर श्राद्धकर्त्याने स्वत: हा स्वयंपाक करावा. ते शक्य नसेल तर त्याच्या पत्नीने करावा. तेही शक्य नसेल तर भावकीने, सजातीय, सदाचारी, स्रेही, मित्र, मातृ-पितृ वंशज यांनी करावा. तेही शक्य नसेल तर सौभाग्यवती, पुत्रवती महिला आदींकडून हा स्वयंपाक करावा, असे शास्त्राने सांगितलेले आहे.

ब्राह्मणांचे आसन कशाचे असावे?श्राद्धातील बारीक-सारीक बाबींचेही शास्त्राने विवेचन केलेले आहे. देवस्थानी व पितृस्थानी भोजनाला बसणाºया ब्राह्मणांचे आसन कसे असावे, याबाबतही स्पष्टपणे सांगितलेले आहे. हे आसन रेशम, लोकर, लाकूड, कुशाचे असावे, असे म्हटले आहे. मात्र, हे आसन लोखंडाचे कदापिही नसावे, असे सांगितलेले आहे.-संकलन : सुमंत अयाचित 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक