- मकरंद सरदेशमुख
- झोपताना कधीही दक्षिणेला पाय करून झोपू नये त्यामुळे आजारपण वाढते आणि माणुस कर्ज बाजारी होतो .
- घराच्या ईशान्य दिशेला वजन ठेऊ नये. ईशान्य दिशा ही नेहमी हलकी आणि मोकळी ठेवावी म्हणजेच घरामध्ये शांतता राहते .
- सुख-समृद्धीसाठी घराच्या मुख्य दरवाज्यासमोर बालाजीचा फोटो लावावा .
- बेडरूममध्ये देवघर किंवा देवाची मूर्ती, फोटो असु नये .
- लाल, काळा, मरून हे तीन कलर घरामध्ये जास्त वापरू नयेत यामुळे घरा मध्ये सुख - समृद्धीदायक आयुष्यासाठी अडचणी येऊ शकतात .
- झोपताना बेड स्विच बोर्ड पाशी येऊ देऊ नये . त्यामुळे निद्रानाशेचा अडथळा येऊ शकतो .
- घरामध्ये नकारात्मक शक्ती प्रवेश करू नये म्हणुन मुख्य दरवाजाजवळ तुळस असणे आवश्यक आहे .
- दरवाजाच्या चौकटीवर आतून बाहेरून विघ्न हर्त्याची म्हणजेच गणपतीची टाईल्स लावणे आवश्यक आहे .
- घराच्या प्रत्येक रूममध्ये खडे मिठाचा बाऊल ठेवणे .
- आठवडयातून एकदा खडे मिठाच्या पाण्याने फरशी पुसणे यामुळे घरामध्ये सुख समृद्धी राहते.
(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)