शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
4
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
5
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
6
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
7
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
8
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
9
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
10
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
11
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
12
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
13
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
14
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
15
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
16
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
17
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
18
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
19
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
20
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
Daily Top 2Weekly Top 5

उदे गं अंबे उदे : आज चौथी माळ, अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी

By दा. कृ. सोमण | Updated: September 24, 2017 02:50 IST

आज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.मित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष २६ हजार ८८२ वर्षे शिल्लक आहेत. कलियुगापूर्वी देवी उपासकांची प्रार्थना ऐकून ...

आज रविवार, २४ सप्टेंबर, आश्विन शुक्ल चतुर्थी आहे. आज अपरान्हकाळी पंचमी असल्यामुळे आजच ललिता पंचमी आहे. आज देवीची पूजा करून देवीसमोर चौथी माळ बांधावयाची आहे.मित्रांनो, हे कलियुग आहे. कलियुगाच्या एकंदर वर्षातून ५,११८ वर्षे मागे पडली असून, अजून ४ लक्ष २६ हजार ८८२ वर्षे शिल्लक आहेत. कलियुगापूर्वी देवी उपासकांची प्रार्थना ऐकून उपासकांना उलट प्रश्न विचारत नव्हती, परंतु हे कलियुग आहे. त्यामुळे भक्तांच्या प्रार्थना ऐकून देवी प्रश्न विचारू शकते.उपासक देवीची पूजा करून देवीची प्रार्थना करतात. काही उपासक प्रार्थना केल्यावर देवीकडे काही ना काही मागणे मागीत असतात. देवी, तू मला संपत्ती दे. मला नोकरी व्यवसायात यश दे. माझे आरोग्य चांगले राहू दे. माझा आजार दूर होऊ दे. मला राहायला घर मिळवून दे. लग्न लवकर होऊ दे. घरात पाळणा हलू दे, अशा प्रकारच्या एक नाही, तर अनेक प्रकारच्या मागण्या देवीपुढे करीत असतात. काही भक्त तर देवीला नवस बोलत असतात. माझे हे काम झाले, तर अमुक पैसे मी तुझ्यापुढील पेटीत टाकीन, मी तुला तमुक नैवेद्य दाखवीन वगैरे वगैरे.परंतु लगेचच देवी भक्ताला काही प्रश्न विचारत असते. तू मेहनती आहेस का? तू नीतिमान आहेस का? तू निर्व्यसनी आहेस का? तू समाजातील गरीब, दीन-दुबळ्यांना मदत करतोस का? तू महिलांचा आदर करतोस का? तू राष्ट्रभक्त आहेस का? तू सकाळी लवकर उठतोस का? तू आर्थिक बचत करतोस का? असे अनेक प्रश्न देवीही विचारत असते.भक्त जसे बोलतो, तसे करतो का? हे देवीला नीट कळत असते. मगच देवी काय करायचे, ते ठरवीत असते. देवी स्वत: श्रीमहालक्ष्मी असल्यामुळे तिला तुमच्या पैशांची आवश्यकता नसते. ती स्वत: अन्नपूर्णा असल्याने, तिला तुमच्या मोठ्या नैवेद्याचीही गरज नसते. त्यामुळे भक्ताने फलप्राप्तीसाठी केवळ पूजा करणे पुरेसे ठरणार नाही, तर स्वत: देवीच्या इच्छेप्रमाणे कृती करण्याची खरी गरज आहे.आज समाजात आळस, अंधश्रद्धा, अविचार, भ्रष्टाचार, अनीती, अस्वच्छता, अज्ञान इत्यादी राक्षस थैमान घालत आहेत. या राक्षसांना ठार मारण्यासाठी देवी आता अवतार घेणार नाही. हे काम प्रामाणिक भक्तांनीच करावयाचे आहे.घरातील देवतानवरात्रात मंदिरातील आणि देव्हाºयातील देवीची पूजा व आरती जोरात केली जात असते, पण घरात चोवीस तास, तीनशे पासष्ट दिवस वावरणाºया देवीकडे काही लोक दुर्लक्ष करतात, हे योग्य नाही. कारण मंदिरातील किंवा देव्हाºयातील देवीपेक्षा घरात वावरणारी देवी जास्त महत्त्वाची आहे. आजी, आई, पत्नी, बहीण, मुलगी, नात या महान देवता आहेत.देवी नवसाला पावते, हा एक मोठा गैरसमज आहे. ती नवसाला पावत नसते. ती पावत असती, तर खूप बरे झाले असते. आतंकवाद्यांना नवस बोलून नष्ट करता आले असते. त्यासाठी आपण सर्वांनी देवीची प्रार्थना करू या, हे देवी मला नेहमी सद्बुद्धी लाभो!या देवी सर्व भूतेषु,बुद्धिरूपेण संस्थिता ।नमस्तस्यै नमस्तस्यैनमस्तस्यै नमो नम: ।।

टॅग्स :Navratri 2017नवरात्रौत्सव २०१७