शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
5
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
6
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
7
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
8
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
9
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
10
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
11
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
12
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
13
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
14
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
15
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
16
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
17
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
18
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
19
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
20
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य

जीवनाचे खरे सार यातच..!

By appasaheb.patil | Updated: December 7, 2019 12:14 IST

जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात.

भगवान श्रीकृष्ण आपल्या परमभक्तावर अत्यंत प्रसन्न झाले होते म्हणून तर भगवंतांनी भक्तश्रेष्ठ अजुर्नाची विश्वरूप दर्शनाची इच्छा पूर्ण केली होती. अजुर्नाला भगवंतांचे चतुर्भुज दर्शन झाले ते केवळ भगवंतांवरील अतूट भक्तीमुळेच. प्रापंचिक वृत्तीला पूर्णपणे छेद केल्यावर, हवे-नकोचा खेळ संपल्यावर, निष्काम बुद्धीने कर्म करण्याची प्रवृत्ती वाढल्यावर, भक्तीमयी आयुष्याची खरी सुरुवात होते. जीवनाचे खरे सार यातच आहे.

जीवनात घटना फार कमी घडतात आणि त्याच्या प्रतिक्रियाच फार होतात. आजचा दिवस हा जवळ-जवळ कालचाच दिवस असतो. आजचा दिवस माणसे आज जगतच नाहीत. ते जगतात शिळा झालेला, निघून गेलेला, भूतकाळात गेलेला कालचा दिवस. त्यामुळे त्यांना जीवनात आणि जगण्यात काही रसच राहात नाही. सर्वकाही निरस होऊन जातं. रोज रोज तेच ते. तोच दिनक्रम, तीच माणसे, तोच रस्ता, तेच काम, तेच जेवण, तेच घर, तेच आॅफिस, तीच नोकरी किंवा तोच धंदा, तीच गिºहाईके, त्यांच्याशी तेच ते बोलणे, जीवनाचा एक साचा होऊन गेलेला असतो. माणूस घाण्याच्या बैलाप्रमाणे त्याच त्या रिंगणातून फिरत असतो. त्याला जीवन जगताच येत नाही. जीवनात प्रत्येक क्षण आनंदोत्सव बनवता येत नाही. जीवन हे खळाळत्या ओसंडून वाहाणा?्या वाहात्या झºयाप्रमाणे आहे. ते नाविन्याने ओथंबलेले आहे. रसरसलेले आहे. मात्र माणसाला त्यातील मजा घेता येत नाही. त्यामुळे ते नको तिकडे मजा शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी वेगवेगळे सण-समारंभ साजरे करतात. अधे-मधे ट्रीप काढतात. मोठ्या दणक्यात कार्यक्रम साजरे करतात. काहीतरी निमित्त शोधतात आणि कार्यक्रम घेतात. असे कार्यक्रम घेण्यामागचे मानसशास्त्र असे आहे की, या मंडळींना जीवनातील जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. तो दुसरीकडे आनंद शोधीत फिरतात. कार्यक्रम असेल किंवा सण-समारंभ असेल. तो आनंदासाठीच निर्माण केलेला असतो. मात्र दुर्दैव असे की असे कार्यक्रम करून येणारे लोक दमून जातात. नंतर ते थकतात. कारण त्यातही त्यांना जो मूळ आनंद आहे, तो सापडलेला नसतो. आनंदानुभूती घेतल्यानंतर दमून जाणे किंवा थकून जाणे असे होता कामा नये, आनंदाने माणूस थकत नाही. तो अधिक उत्साही बनतो. अधिक कार्यक्षम बनतो. पण या मंडळींना त्यातही आनंद मिळत नाही. तो केवळ आनंदाभास असतो.- साईनाथ महाराज स्वामी,शेळगी, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक