शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

आनंदाकडचा प्रवास आनंदायन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 18:30 IST

सुखापेक्षा आनंद बरा.! तो आपल्याला विचारतोय मला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळतं?

- रमेश सप्रे

सुखापेक्षा आनंद बरा.!तो आपल्याला विचारतोयमला सांगा.. सुख म्हणजे नक्की काय असतं?काय पुण्य केलं की ते घरबसल्या मिळतं?असं गात म्हणताना तो नि त्याची ती आनंदात नाचत-बागडत असतात. मागची साधी भिंत सुंदर पर्वतासारखी भासते तर समोरचा जलाशय नितळ सरोवरच बनून जातो. दोघंही उमलत असतात, फुलत असतात. झुल्यावाचून झुलत असतात. 

हे साधं गद्य प्रश्न विचारणारं गाणं एक महत्त्वाचं जीवनसूत्र सांगून जातं. सुख म्हणजे काय हे जरी समजलं नाही तरी ते घरबसल्या मिळू शकतं. हे खरंच आहे की सुखाच्या अनुभवासाठी दाहीदिशा वणवण करण्याची गरज नाही. इथलं घर म्हणजे दगडविटांची वास्तू नाही तर ते अगदी आपलं अंतरंग-अंत:करणही असू शकतं. 

एका शिबिरात पहिल्या दिवशी एक गृहपाठ दिला गेला. आपापल्या सुखी होण्याच्या कल्पनेनुसार सुख देणा-या वस्तूंची यादी करायची. अनेकांनी घर, गाडी, सुखसोयीची साधनं यांची समग्र यादी तयार करून आणली. दुसरे दिवशी या प्रत्येक गोष्टीपुढे अंदाजे किंमत लिहून एकूण किती रक्कम मिळाली की हव्या त्या वस्तू घेऊन आपण सुखी होऊ हे लिहून आणायला सांगितलं. त्याप्रमाणो केल्यानंतर पुढचा गृहपाठ दिला की सा-या ठिकाणाहून मिळणा-या उत्पन्नाचा पैशाचा विचार करून सुखी होण्यासाठी आवश्यक तितके पैसे मिळवायला किती दिवस लागतील त्याचा विचार करायला सांगितला. एका अर्थी प्रत्येकाचा सुखी होण्याचा मुहूर्त ठरला. आता एक विचार पुढे आला की आवश्यक तेवढे पैसे साठण्यासाठी काही वर्षे लागतील. त्या कालात आपल्या यादीतील वस्तूंच्या किमती वाढणार नाहीत का? म्हणजे सुखी होण्याचा दिवस आणखी पुढे गेला नि तो असा जातच राहणार. कारण परिस्थिती बदलत राहणार नि ती आपल्या हातात नसणार. 

म्हणजे कुणी सुखी होणारच नाही की काय?असं असेल तर साधूसंत, महात्मे सत्पुरुष सुखी नव्हते? समर्थ रामदास मनाच्या श्लोकात म्हणतात जगी सर्व सुखी असा कोण आहे।हा प्रश्न नाहिये. कारण पुढच्याच ओळीत ते सांगतात 

विचारे मना तूचि शोधूनि पाहे।।म्हणजे विचार करून, चिंतन करून समजून घेतलं पाहिजे की सदैव सुखात असणारे कोण आहेत नि ते तसे कसे बनले?यासाठी आपल्याला प्रथम सुख म्हणजे काय ते निश्चित समजलं पाहिजे. ‘सुख’ या छोटय़ा शब्दाचे दोन भाग आहेत. ‘सु’ म्हणजे चांगले. शुभ, कल्याणकारी आणि ‘ख’ म्हणजे आकाश, परिसर, भवताल (आजूबाजूची परिस्थिती) सुखाचा सरळ अर्थ आहे आपल्या भोवती असलेलं, नव्हे आपण निर्माण केलेलं व्यक्ती- वस्तूचं जग जे आपल्याला सुख देणारं असतं. सुखाचा संबंध देहाच्या उपभोगांशी, आरामाशी येतो. त्यामुळे सुख हे सदैव वस्तू, व्यक्ती, परिस्थिती यांच्यावर अवलंबून असतं. अन् या सा-या गोष्टी सदैव बदलणा-या असतात म्हणून संत सांगतात-

‘सुख सुख म्हणता हे दु:ख ठाकून आले’ ‘सुख जवापाडे, दु:ख पर्वताएवढे’ म्हणून सुखाऐवजी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करायला हवा. आनंद कशावरही अवलंबून नसतो. सुखभोगाच्या वस्तू असल्या तरी तसेच नसल्या तरी आनंदात राहता येतं. आनंदाचा उगम आपल्या आतच असतो. तो अखंड उसळत असतो. ख-या आनंदी व्यक्तीमधून आनंदाचा प्रवाह आतून बाहेर वाहत असतो. तो सर्वाना आनंदी बनवत असतो. 

प्रपंचात कितीही संकटं आली तरी तुकारामाचा अनुभव हाच होता. आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे।।आनंदमार्गी मी, आनंदयात्री मी.. म्हणणारे कवी अनेक असतात; पण ख-या आनंदाचा अनुभव घेणारे संत नि महामानव वेगळेच असतात. त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा घेत आपण सुरु ठेवू या आपला आनंदाकडचा प्रवास आनंदायन!

टॅग्स :spiritualअध्यात्मिक