शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मनोपालटातून कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 21:11 IST

‘स्वस्तिक’ वसाहतीत नव्यानं राहायला आलेले आजी-आजोबा थोड्याच अवधीत सर्वांचे लाडके बनले.

- रमेश सप्रे‘स्वस्तिक’ वसाहतीत नव्यानं राहायला आलेले आजी-आजोबा थोड्याच अवधीत सर्वांचे लाडके बनले. नाव विचारल्यावर म्हणायचे ‘आजी-आजोबा एवढंच पुरेसं नाही का?’ खरं तर होतं; कारण लोक त्यांना रमाआजी नि राम आजोबा म्हणून थोडंच म्हणणार होते. दोन्ही मुलं होती परदेशात. म्हणजे एन.आर.आय.! आजोबा काहीशा खेदानं आवंढा गिळत म्हणायचे ‘मुलं असतील नॉन रेसिडंट इंडियन्स एन.आर.आय. पण आम्हीही त्यांच्या दृष्टीनं एन.आर.आय.च आहोत की - नॉट रिक्वायर्ड इंडिव्हिज्युअल्स!’ पण त्यांची ही खंत ‘स्वस्तिक’ वसाहतीतील अनेक कुटुंबांची होती. जीवनाच्या भिववणा-या संध्याछायेत दोघं दोघं एकमेकांच्या आधारानं राहायची. दोघांचा मिळूनही एक पूर्ण आधार व्हायचा नाही. एकाच्या हातांना कंप तर दुसरीच्या मानेला. त्यांच्याबद्दल अनुकंपा म्हणजे सहानुभूती वाटली तर तेही त्यांना आवडायचं नाही.सण आले की ही मंडळी उदास व्हायची. दोघांसाठी काय जेवण करायचं? त्यांना गोड खूप आवडायचं. श्रीखंड, बासुंदी, जिलेबी, गुलाबजामून म्हणजे जीव की प्राण! काही वर्षापूर्वी मधुमेह म्हणजे डायबेटीस झाला. तमाम गोड पदार्थ बंद म्हणजे बंद. आजींना आवडायचे झणझणीत, चमचमीत पदार्थ, रोजच्या जेवणात काहीतरी तळलेलं, कोणता तरी रस्सा असायचाच. पण रक्तदाब (बी.पी.) वाढल्यापासून सारं जेवण अळणी, सपक बनून गेलं. तरीही अनेक कुटुंबात असलेल्या आजी आजोबांना याची सवय झाली. कारण शरीराशी संबंधित गोष्ट होती ना ही? पण दूर राहणारी मुलं नि दुरावलेली नातवंडं यामुळे त्यांची मनं मात्र सतत उदास असत. मोबाइलवरून बोलून बोलून किती बोलणार? आणि टीव्ही तरी बघून बघून किती बघणार? एकमेकांशी गप्पा माराव्यात तर भूतकाळातल्या गोड आठवणीही डोळ्यातून अश्रू काढत, भविष्यकाळातील शरीर-मन यांच्या स्थितीची, परावलंबी परिस्थितीची कल्पनाही असह्य होई आणि या दोन्ही काळांच्या कात्रीत वर्तमानकाळसुद्धा असह्य होऊन जाई.जर व्हिडिओ शूटिंग म्हणजे चित्रीकरण केलं असतं स्वस्तिक कॉलनीचं तर डोक्याला माकडटोपी, गळ्याला मफलर किंवा मानेच्या वेदना कमी करणारी कॉलर, हातात या किंवा त्या प्रकारची काठी, डोळ्यांना जाड भिंगाचे चष्मे तर कानांना लावलेली श्रवणयंत्रं असा गणवेश घालून थरथरत, तोल सावरत जाणा-या पडद्यावरच्या आकृतीसारखी माणसांची वसाहत वाटली असती. बरीचशी विझल्या विझल्या सारखी. प्रत्येक जण म्हणजे एक बेट आणि वसाहत म्हणजे जणू द्विपसमूह! रमाआजी नि रामआजोबांनीही पहिले काही दिवस हुंदके देणा-या दबल्या स्वरात उसासे टाकणा:या वसाहतीत काढले. त्यांची शरीरं त्या मानानं ताठ नि स्थिर होती; पण मनं मात्र खूप ऊर्जा असलेली, सकारात्मक विचार करणारी होती. ‘ते काही नाही. हे चित्र बदलायलाच हवं’ एक दिवस रमाआजी काहीशा निर्धारानं म्हणाल्या, रामआजोबाही त्यांच्या सुरात सूर मिसळून म्हणाले, ‘ माहितीय ना? जो बदल घडवायचाय तो बदल तुम्ही स्वत: बनलं पाहिजे. बी द चेंज!’ दोघंही एकदम उद्गारले ‘तर ठरलं तर मग. आपणच बदलायला सुरू केलं पाहिजे.’ नुसतं म्हणून दोघंही थांबले नाही. कार्यक्रम सूत्रबद्ध तयार करण्यात राम आजोबा प्रवीण होते. तर सूत्रसंचालन करून तो कार्यक्रम राबवण्यात रमाआजी पटाईत होत्या. दोघांनी चर्चा करून एक पंचसूत्री कार्यक्रम तयार केला.* ‘स्वस्तिक’ वसाहतीत ई ब्लॉकमध्ये राहणा-या मध्यमवयीन कुटुंबासह एक ज्येष्ठ मंडळीची बैठक घेणं, स्थान वसाहतीतील उद्यानातली हिरवळ.*  युवकांच्या एका सेवाभावी संघटनेतील स्वयंसेवकांमार्फत वृद्धांच्या निवासस्थानांची स्वच्छता, सजावट नि विद्युत रोषणाई करून घेणं.* जवळच असलेल्या दिवाळीला वसाहतीच्या सभागृहात एकत्र फराळ करणं. पदार्थ अर्थातच शुगर फ्री आणि कमी मसालेदार.* वसाहतीतील 20 वर्षांखालील युवा नि मुलं यांच्यासाठी उपयुक्त अशी पुस्तकं दिवाळीची भेट म्हणून देणं. ठरावीक दिवशी या पुस्तकांच्या वाचनावर आधारित स्पर्धा घेऊन योग्य बक्षिसं देणं.* मुख्य म्हणजे दर पौर्णिमेला एकत्र जमून (गेट टुगेदर) शुद्ध गप्पा मारणं. सहभोजन करणं.वसाहतीतल्या चौकीदाराकडून सर्वाचे क्रमांक घेऊन व्हॉटसअॅप संदेश पाठवले सुद्धा. बैठकही झाली. अनेकांच्या मनात घोळणारी ही कल्पना रमाआजी-रामआजोबांमुळे प्रत्यक्षात आली म्हणून गुलाबपुष्प देऊन नि टाळ्या वाजवून त्यांना धन्यवाद दिले गेले. विशेष म्हणजे दुस-या दिवशीपासून ‘स्वस्तिक’मधलं वातावरण चैतन्यमय बनून गेलं. सभेमध्ये दिलेली वैयक्तिक नि सामूहिक जबाबदारी पार पाडण्याची लगबग सुरू झाली, वसाहतीचा चेहरा मोहरा बदलून गेला. जणू कायापालटच झाला. धनत्रयोदशीच्या दिवशी घराघरासमोर आकाशदिवे चमकत लहरू लागले. नरकचतुर्दशीला पहाटे सर्वत्र पणत्या तेवू लागल्या. रांगोळ्या सजल्या. फराळासाठी अनेकजण एकत्र जमले. हे आनंदाचं वातावरण हीच खरी दिवाळी होती. राम आजोबा म्हणाले, ‘आज आपली वसाहत ख-या अर्थानं स्वस्तिक बनली. सु-अस्ति-क म्हणजे सर्वाचे कल्याण करणारी!