शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 18:23 IST

तुकाराम महाराज भवसिंधू तरुन जाण्यासाठी फक्त विचाराचेच साधन सांगतात

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

परमेश्वराने जी सृष्टी निर्माण केली त्यामध्ये जारज, स्वेदज, अंडज व उद्भिज अशा प्रकारच्या चार खाणी निर्माण केल्या. त्यांपैकी जारज खाणीतून मनुष्य निर्माण केला. मनुष्याला बुद्धी व ज्ञान असल्याने तो दुःख निवृत्ती करु शकतो व याच ज्ञानाने परमानंद सुखाची प्राप्तीही करुन घेऊ शकतो पण ज्ञानप्राप्ती करुन घेण्यासाठी काय करायला हवे..? तर, तुकोबांनी उपाय सांगितला आहे. महाराज म्हणतात -

क्षणोक्षणा हाचि करावा विचार ।तरावया पार भवसिंधू ॥

हा देह अत्यंत क्षणभंगूर असल्याने जो विचार करणार आहात तो क्षणोक्षणी करा, दिरंगाई नको. भवसिंधू तरुन जाण्याचा उपाय सोपा असला तरी हा उपाय क्षणोक्षणी करावा लागेल. कारण महाराज म्हणतात -

अनंत बुद्धीचे तरंग । क्षणाक्षणा पालटती रंग ॥

ज्या कर्माचे जसे संस्कार असतील तशीच बुद्धी होते.शास्त्रकार म्हणतात -

बुद्धि: कर्मानुसारिणी ।

आपण म्हणाल, वेदशास्त्राने एवढी साधने सांगितली असतांना नुसत्या विचाराने काय होणार..? वेद शास्त्राने भवसिंधू तरुन जाण्यास योग, याग, तप, जप, इ. अनेक साधनें सांगितली मात्र तुकाराम महाराज या ठिकाणी भवसिंधू तरुन जाण्यासाठी फक्त विचाराचेच साधन सांगतात हे कसे..?आज कलियुगाचा विचार करता, तुकाराम महाराज म्हणतात -

अवघ्या वाटा झाल्या क्षीण । कलि न घडे साधन ॥उचित विधी विधान । न कळे न घडे सर्वथा ॥

ही सर्व साधनें फारच अवघड आहेत. सध्याच्या काळात या शास्त्रातील कर्मे यथासांग घडणें खूप कठिण काम आहे. आणि जर कर्म यथासांग घडले नाही तर संत म्हणतात -

कर्म धर्म न होती सांग । उण्या अंगे पतन ॥

ही सर्व साधनें भवसिंधूत ढकलणारी आहेत. एकमेव विचार हीच साधना भवसिंधुतून निवृत्त करणारी आहे..!

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत, त्यांचा दूरभाष क्रमांक ९४२१३४४९६० ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक