शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

उलटसुलट विरुद्ध ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 22:58 IST

उलटसुलट विचार का येतात कारण स्वत:बद्दलचा डळमळीत झालेला आत्मविश्वास!

उलटसुलट विचार हे मनाच्या कमकुवतपणाचं लक्षण असू शकतं. ठाम विचार हे मनाच्या सुदृढतेचं लक्षण मानलं गेलं. उलटसुलट विचार का येतात, त्याचा उगम कुठे असतो आणि त्या उलटसुलट विचारांचा मारा थांबविण्यासाठी कमकुवत मनासाठी काय केलं पाहिजे हा जटिल प्रश्न नेहमीच शिल्लक राहतो.

उलटसुलट विचार का येतात कारण स्वत:बद्दलचा डळमळीत झालेला आत्मविश्वास! त्याचा उगमसुद्धा अस्ताव्यस्त जीवनशैलीतून जन्म घेत असतो आणि अशा उलटसुलट विचारांच्या माऱ्याला थांबविण्यासाठी आपणच आपुले गुरू बनणे पहिले महत्त्वाचे काम असते. माणूस हा इतरांचे दोष काढण्यात सदैव अग्रेसर असतो. परंतु स्वत:च्या दोषाकडेसुद्धा तितक्याच अलिप्तपणे पाहून त्यावर मनन आणि चिंतन करून आपणच त्या उलटसुलट विचारांचा नायनाट करून विचारांना उत्तम तत्त्वाने प्रेरित केले पाहिजे. उलटसुलट विचाराचा निर्माता हा स्वत:च्या मनातच ठाण मांडून बसलेला असतो.

नको ते बघणे, नको ते ऐकणे, त्यावर विचार न करता बोलणे, त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीला आणखी चिघळत नेणे, त्यातून हट्टाच्या भूमिकेमुळे माघार न घेणे, तारतम्याची भूमिका न घेता आपणच कसे योग्य आहोत आणि इतर बोलणारे-वागणारे कसे चुकीचे आहेत, असा गोड गैरसमज करून घेतल्यामुळे बाजू आपल्यावर उलटत जाते. त्यातून निर्मिती ही दु:खाची आणि फक्त निराशेची. योग्य वेळी योग्य विचार मनात आणणे आणि उद्भवलेल्या परिस्थितीपुढे त्याचे तारतम्याने प्रकटीकरण करणे हेच पहिले सुंदर उचललेले पाऊल असू शकते. आपल्या रजोगुणाकडून आपण सत्गुणाकडे सरकतोय असे स्वत:ला वाटलेपाहिजे. आपला विचार वास्तवाच्या दिशेने नेला पाहिजे.

-विजयराज बोधनकर