शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म एक तत्त्वज्ञान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 22:32 IST

अध्यात्म विद्या म्हणजे एक तत्त्वज्ञान आहे. या विद्येचा शोध मनुष्यात दिव्य गुणांची वाढ करून त्याला त्याच्या परमोच्च ध्येयापर्यंत पोहोचविणे आहे. स्वत:च्या चैतन्य शक्तीचा विकास करून त्याद्वारे परमोच्च आनंद व सृष्टीचे अंतिम सत्य जाणणे हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. यालाच सच्चिदानंदस्वरूप परमेश्वरप्राप्ती सुद्धा म्हणतात. नराचा नारायण बनण्याच्या मार्गावर चालण्याने शेवटी मानवी समाज व्यवस्थाच उत्कृष्ट बनत असते. सत्यप्राप्तीच्या या मार्गाला निश्चित असा अंत नाही. हा सतत चालत राहण्याचा, पाशवीपणाशी अनवरत संघर्ष करीत राहण्याचा मार्ग आहे. चराचरात व्याप्त असलेला परमेश्वर जो अनंत दिव्य शक्तींचा समुच्चय आहे तो माझ्यात सुद्धा सूक्ष्म रूपाने सुप्तावस्थेत विद्यमान आहे आणि त्या शक्तीला विकसित करून ईश्वरप्राप्ती करून घेणे हाच अध्यात्माचा मूळ सिद्धांत आहे.

ठळक मुद्देअध्यात्म विद्या म्हणजे एक तत्त्वज्ञानपरमेश्वर प्राप्तीचे असंख्य मार्ग : वैदिक वाङ्मय

हेमंत बेंडेअध्यात्म विद्या म्हणजे एक तत्त्वज्ञान आहे. या विद्येचा शोध मनुष्यात दिव्य गुणांची वाढ करून त्याला त्याच्या परमोच्च ध्येयापर्यंत पोहोचविणे आहे. स्वत:च्या चैतन्य शक्तीचा विकास करून त्याद्वारे परमोच्च आनंद व सृष्टीचे अंतिम सत्य जाणणे हेच मनुष्य जीवनाचे ध्येय आहे. यालाच सच्चिदानंदस्वरूप परमेश्वरप्राप्ती सुद्धा म्हणतात.नराचा नारायण बनण्याच्या मार्गावर चालण्याने शेवटी मानवी समाज व्यवस्थाच उत्कृष्ट बनत असते. सत्यप्राप्तीच्या या मार्गाला निश्चित असा अंत नाही. हा सतत चालत राहण्याचा, पाशवीपणाशी अनवरत संघर्ष करीत राहण्याचा मार्ग आहे. चराचरात व्याप्त असलेला परमेश्वर जो अनंत दिव्य शक्तींचा समुच्चय आहे तो माझ्यात सुद्धा सूक्ष्म रूपाने सुप्तावस्थेत विद्यमान आहे आणि त्या शक्तीला विकसित करून ईश्वरप्राप्ती करून घेणे हाच अध्यात्माचा मूळ सिद्धांत आहे.अध्यात्माचे वरवर दिसणारे कलेवर म्हणजे परमेश्वराची भक्ती अथवा उपासना होय. परमेश्वर प्राप्तीचे असंख्य मार्ग आहेत, असे वैदिक वाङ्मय सांगते. सत्यप्राप्तीपर्यंत पोचण्याचे अनंत मार्ग हे माझ्याच दिशेने येतात व विद्वान लोक मलाच वेगवेगळ्या नावाने संबोधतात, असा सहिष्णु व महान उपदेश वेद ग्रंथात सांगितला आहे. हाच हिंदू धर्माचा सर्वधर्मसमभाव सांगणारा संदेश आहे.परमेश्वरी शक्तींना म्हणजे दिव्य गुणांना जीवनात स्थान देणे हीच त्याची खरी उपासना आहे. यासाठी स्वत:च्या अंतरंगातील मलीनतेला दूर करावे लागते. शुद्ध व पवित्र जीवनाचा मार्ग चोखाळावा लागतो. यालाच उपनिषद ग्रंथ आत्मविद्या अथवा ब्रह्मविद्या म्हणतात. सर्व प्रकारच्या उपासनेचे ध्येय म्हणजे चित्तशुद्धी. या मार्गावर चालणे म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे आहे असा स्पष्ट संदेश उपनिषदात दिलेला आहे. मनुष्याचे पशुत्वाकडून देवत्वाकडे प्रस्थान करणे हेच अध्यात्म विद्येचे प्रयोजन आहे.अध्यात्म तत्त्वज्ञानाचे व्यावहारिक व सामाजिक स्वरूप म्हणजे धर्म होय. धर्म म्हणजे एखादी ठराविक उपासना पद्धती नव्हे तर उत्कृष्ट समाजाच्या धारणेसाठी जे काही आवश्यक कर्तव्य मनुष्याला करावे लागतात, त्यांनाच धर्म म्हटल्या गेले आहे. प्राचीन धर्मग्रंथात धर्म शब्दाच्या ज्या काही व्याख्या व स्पष्टीकरणे आढळतात त्यावरून त्याचा संबंध कर्तव्याशी निगडीत दिसून येतो. समाज धर्म, राष्ट्र धर्म, गृहस्थ धर्म, पतिव्रत धर्म, पत्नीव्रत धर्म, वर्णाश्रम धर्म असे असंख्य धर्म ( कर्तव्य ) मनुष्याला अंगीकारावे लागतात. आजच्या भाषेत याला राष्ट्र अथवा जगाचे संविधान सुद्धा म्हणता येईल. हेच काम प्राचीनकाळी धर्मशास्त्रकारांनी केले. संविधानातील नियमांचे पालन उत्तमरीतीने व्हावे याकरिता प्रत्येक मनुष्याने उत्तम नागरिक बनावे हे अपेक्षित असते. यासाठी मनुष्याच्या योग्य शिक्षणाची, संस्काराची व्यवस्था करावी लागते, जेणेकरून त्यात माणुसकी येईल आणि या सृष्टीतील प्रत्येक घटकाला जगण्याचा समान हक्क आहे ही जाण त्यात विकसित होईल. अध्यात्म विद्येने आत्मविकास साध्य झाला की मनुष्य ‘जगा आणि जगू द्या’ या तत्त्वावर चालू लागतो आणि परिणामस्वरूप समाजसुद्धा विकसित होतो.हेमंत बेंडेगायत्री परिवार प्रचारक

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकHinduहिंदू