शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
6
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
7
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
8
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
9
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
10
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
11
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
12
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
13
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
14
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
15
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
16
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
17
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
18
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
19
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा

जगण्याची कला शिकविणारे आध्यात्मिक गुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:51 IST

आध्यात्मिक गुरू म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो, त्या श्री श्री रवीशंकर यांचा १३ मे हा जन्मदिन.

आध्यात्मिक गुरू म्हणून ज्यांचा गौरवाने उल्लेख केला जातो, त्या श्री श्री रवीशंकर यांचा १३ मे हा जन्मदिन. त्या निमित्ताने त्यांचे आध्यात्मिक कार्य, शांततेसाठी केलेले प्रयत्न, योगाच्या प्रसारासाठी त्यांनी दिलेले योगदान, वेगवेगळ््या क्षेत्रांतील थक्क करणारेकाम यावर टाकलेला दृष्टिक्षेप...आनंदाने जगण्याची कला म्हणजेच ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’ असा नुसता उल्लेख जरी केला, तरी श्री श्री रवीशंकर यांचे अहोरात्र सुरू असलेले कार्य डोळ््यासमोर उभे राहते. आध्यात्मिक शांती, योगा, जगण्याची नवी दृष्टी देणारी प्रेरणा, जेथे जेथे संघर्ष आहे, तेथे हळूवार फुंकर घालण्याचे काम, शेतकऱ्यांना केलेली मदत अशा विविध कारणांनी श्री श्री रवीशंकर यांचे काम आपल्या सदैव स्मरणात राहते.यमुनातटी जागतिक शांततेसाठी केलेले प्रयत्न असोत, की राम मंदिरासाठी केलेली मध्यस्थी असो, त्यातील त्यांचा पुढाकार नेहमीच चर्चेत राहिला आहे.योगाचा प्रचार, प्रसार करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदानही अमूल्य आहे. जगण्याची कला शिकवताना त्यातील मन:शांतीचे, आनंद मिळवण्याचे प्रयत्न किती महत्वाचे आहेत हे त्यांनी त्यांच्या जगभरातील अनुयायांना शिकवले. त्यातून कोट्यवधी लोकांचे जगणे समृद्ध केले. अजूनही करत आहेत.जगात जेथे संघर्ष आहे, तेथे त्यांनी शांततेसाठी धाव घेतल्याचे दिसून येते. इसीसचा संघर्ष, कोलंबियातील गृहयुद्ध, इराकमधील तापलेले वातावरण अशा अनेक ठिकाणी त्यांनी शांततेसाठी पुढाकार घेतला. विद्रोहींना हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारण्यासाठी त्यांचे मन वळवण्यात रवीशंकर यांच्या प्रयत्नांनी यश मिळाले. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी किंवा फुटीरतावाद्यांनी हाती घेतलेल्या बंदुका खाली ठेवाव्यात म्हणून ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्यात त्यांचाही समावेश आहे. तेथे सामाजिक चळवळ सुरू करण्यात, १२ हजार काश्मिरींना एकत्रित आणण्यात त्यांनी मोलाचा पुढाकार घेतला. उत्तर पूर्व भारतातील सात राज्यातील प्रमुख विद्रोही गटांना एकाच मंचावर आणून त्यांच्यात समेट घडवून आण्याचे प्रयत्न त्यांनी केले. तेथे विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचे कामही त्यांनी केले.मन:शांती आणि आंतरिक स्थैर्य कसे प्राप्त करावे, याची शिकवण देण्याचे कामही रवीशंकर यांच्यातर्फे अखंड सुरू आहे. ज्यांनी शिकवलेली जगण्याची कला- आर्ट आॅफ लिव्हिंग- जगभरातील ४५ कोटी जणांनी आत्मसात केली आहे, यातच त्यांच्या कामाचे यश सामावले आहे. त्यात शेतकऱ्यांपासून कॉर्पोरेट कल्चरपर्यंतच्या सर्व वर्गांचा समावेश आहे, हे विशेष. देशातील ४१ कोरड्या नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी धडपड, जगातील ६५ देशांतील आठ लाख कैद्यांचे पुनर्वसन, आपत्कालीन क्षेत्रात मदतकार्य, शिक्षणाचा प्रसार करण्यापर्यंत अश्या सर्व क्षेत्रांत त्यांचे कार्य अविरत सुरू आहे.१९ राज्यांतील २२ लाख शेतकºयांसाठी झिरो कॉस्ट शेतीचे प्रशिक्षण, स्वच्छता मोहीम, ग्रामीण भागात सामुदायिक नेतृत्वासाठी ४० हजार खेड्यांतील सुमारे अडीच लाख युवकांना प्रशिक्षण, ३६ देशात आणि भारतातील २६ राज्यात आठ कोटी १० लाख वृक्षांचे रोपण, ३८१९ घरे, ६२ हजारांपेक्षाही अधिक शौचालये, १२०० बोअरवेल्स, १५९२ बायोगॅस प्लँट अशी त्यांच्या कामांची यादी चढती आहे. नुकतेच त्यांच्यातर्फे राष्ट्रीय नशामुक्त भारत अभियान सुरू झाले.जर तुमचे मन तणावमुक्त असेल, तरच तुम्ही सकारात्मक विचार करू शकता, असा संदेश रवीशंकर देतात. जगण्याची कला शिकवण्याचे त्यांचे कार्य असेच सुरू ठेवण्याची ऊर्जा त्यांच्याकडून यापुढेही सर्वांना मिळत राहील.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक