शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

मस्तक ठेंगणा।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 16:23 IST

मस्तक ठेंगणा। करी संतांच्या चरणा।। सामान्य मानवी जीवन जगताना आम्हाला आमच्या दैनंदिन व्यवहारात कितीतरी वेळा झुकावं लागतं. वेगवेगळ्या व्यक्ती, ...

ठळक मुद्देजीवनाची बिघडलेली सूत्रे व्यवस्थित करतात.

मस्तक ठेंगणा। करी संतांच्या चरणा।।सामान्य मानवी जीवन जगताना आम्हाला आमच्या दैनंदिन व्यवहारात कितीतरी वेळा झुकावं लागतं. वेगवेगळ्या व्यक्ती, परिस्थिती आणि घटना यांना शरण जावं लागतं किंवा त्यांच्यासमोर आपला माथा झुकवावा लागतो. तुकोबारायांच्या मते जर मस्तक झुकवणं अपरिहार्यच असेल तर संतांच्या किंवा सज्जनांच्या चरणी ते झुकवावं. याचं कारण असं की, इतर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या झुकण्याचा अर्थ वेगवेगळा काढला जाईल. कधी कधी त्याचं भांडवलही केलं जातं; पण संतांच्या चरणी लीन झालं, की संत आपल्या झुकण्याला सार्थता आणि सार्थकता प्राप्त करून देतात. जीवनाचे हरवलेले सूर शोधून देतात. जीवनाची बिघडलेली सूत्रे व्यवस्थित करतात. याचसाठी आमचे तुकोबाराय म्हणतात की,‘भाग्याचा उदय। ते हे जोडी संतपाय।।’आमच्या जीवनातील आम्ही भाग्य म्हणून समजत असलेल्या सर्वच गोष्टींना भाग्य समजता येईल असं नाही, पण‘भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा।निकट वास बरा संतापायी।।या न्यायाने सज्जनांच्या पायांची उपासना आपल्याला करता येणं हेच आपलं खरं भाग्य. आम्ही या भाग्याच्या अधीन झालो, की होणारा आणखीन एक फायदा म्हणजे आम्ही सुखी होतो आणि खूप सुखी होतो. सज्जनांच्या पायी प्राप्त होणारं सुख खूप खूप अनमोल असून, ते अद्वितीय आहे; मात्र आपण जर दुर्जनांच्या पायांची उपासना करू लागलो किंवा त्याची संगत करू लागलो, तर त्याची फळंही आपल्याला तशीच मिळत राहतील, म्हणूनच सुसंगती सदा घडो, सृजन वाक्य कानी पडो, हे आपण आचरणात आणलं, तर सज्जनांच्या पायांची उपासना आपोआपच घडेल आणि सुख मिळेल. आपण ते अनुभवावं एवढीच अपेक्षा.