शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुखी होणे सोपे दु:खी होणे कठीण - भाग १३

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 15:02 IST

स्वर्ग व नरकाच्या चुकीच्या कल्पना घेऊन लोक जीवन जगत असतात.जीवनविद्या सांगते असा स्वर्ग व नर्क कुठेच नाही आहे.मग लोक मला विचारतात वामनराव हे तुम्ही कशावरून म्हणता.

- सदगुरू श्री वामनराव पै

स्वर्ग नर्क वाटा चोरांच्या

स्वर्ग व नरकाच्या चुकीच्या कल्पना घेऊन लोक जीवन जगत असतात.जीवनविद्या सांगते असा स्वर्ग व नर्क कुठेच नाही आहे.मग लोक मला विचारतात वामनराव हे तुम्ही कशावरून म्हणता. लक्षात ठेवा मी जे सांगतो त्यामागे नेहमी तर्कशास्त्र असते.तुम्ही बघा आतापर्यंत तुमचे पणजोबा गेले, आजोबा गेले, वडिल म्हणत नाही कारण वडिल अजून असतील पण जे गेले त्यांच्यापैकी कुणीतरी सांगितले का की मी इथे स्वर्गात सुखात आहे किंवा मी नरकात दु:खात आहे. असे कुणीतरी तुम्हांला येऊन सांगितले का आजीने,पणजीने सांगितले का किंवा तुमचा मित्र गेला त्या मित्राने सांगितले का कुणीही येऊन असे सांगत नाही| त्यांनी तुम्हांला फोन किंवा फॅक्स केला का, एसएमएस केला की मोबाईलवर फोन केला का काहीही केले नाही.स्वर्ग नर्क हया कल्पना सांगितल्या गेल्या तेव्हा त्या मागे त्यांचा हेतू चांगला होता.लोकांनी चांगले वागावे,चांगले जीवन जगावे,आनंदाने रहावे हा त्यामागे हेतू होता.ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी म्हटले आहे“स्वर्ग नर्क वाटा चोरांच्या” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले आहे.स्वर्ग नर्क वाटा चोरांच्या हयाचा अर्थ काय तर स्वर्ग व नर्क याबाबत जे सांगतात ना ते चोर आहेत.सांगायचा मुद्दा असा सर्व धर्म परित्यज्य याचा अर्थ सर्व उपासना मार्ग सोड व मी ला शरण जा.आता मी म्हणजे कोण “तैसा ह्रदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम” त्या रामाला शरण जा.जो तुझ्या ह्रदयांत आहे.ज्ञानश्वरी वाचताना कशी वाचली पाहिजे ते लक्षांत घ्या.तैसा ह्रदयामध्ये मी असे वाचले की थांब मग कोण राम कसा राम याचा विचार कर.सर्व सुखाचा आराम याचा नीट अर्थ लक्षांत घेवून वाच. ज्ञानेश्वरी भरभर वाचून तुला काय कळणार.यासाठी ज्ञानेश्वरीतील एकतरी ओवी अनुभवाव.भगवतगीता पाठ करण्यापेक्षा तुम्हाला त्यातील एक तरी श्लोक समजला. व तुम्ही तो जगाला समजावून सांगितला तर जग सुखी होईल. तुम्ही जे सर्व धर्म म्हणता ते  मुळात धर्मच नाहीत तर ते उपासनेचे निरनिराळे मार्ग आहेत.उपासनेचे मार्ग प्रत्येकाचे वेगवेगळे असतात.कुणी प्रार्थना करतं,कुणी नमाज पडतं तर कोणी पारायण करतात तर कोणी चर्चमध्ये जावून प्रार्थना करतात. हे उपासनेचे मार्ग वेगवेगळे असले तरी  त्या सर्वांचा देव एकच आहे.देव वेगवेगळे असते तर भांडणे नसती का झाली? परमेश्वर एक आहे.सबका मालिक एक असे साईबाबा सांगायचे ते अगदी खरे आहे.सर्वांचा देव हा एक आहे आता त्याची उपासना कशी करायची हे  मात्र तू ठरव.तू अमूकच कर किंवा तमूकच कर अशी जबरदस्ती कोणावरही कोणी करु नये.प्रत्येकाला जे आवडते ते त्याने करावे.मला अळुची भाजी फार आवडते म्हणून तुम्ही देखील तीच खाल्ली पाहिजे अशी जबरदस्ती करुन कसे होईल.