शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

संताची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 3:09 AM

ज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे.

- डॉ.भूषण कुमार उपाध्यायज्ञान, भक्ती आणि कर्म यांच्याद्वारे परमचैतन्याला प्राप्त करणाऱ्या लोकांसाठी भारतीय संस्कृतीत अनेक शब्दांचा उपयोग केला गेला आहे. या शब्दांमध्ये संत हा शब्द फारच महत्त्वपूर्ण आहे. या संत शब्दाची उत्पत्ती संस्कृतच्या सन् शब्दापासून झाली आहे. सन् या शब्दाचा अर्थ आहे ‘होत असलेला’. होत असल्या बाबतची जी क्रि या आहे ती केवळ वर्तमानकाळातच होऊ शकते. शेवटी संत तो आहे जो वर्तमान काळातच राहतो. तो भूत किंवा भविष्यकाळ या दोन्हींपासून लांब राहात असतो. साºया चिंता आणि तणाव यांचे कारण हे एकतर भूतकाळापासून किंवा भविष्यकाळापासून निर्माण होते. शेवटी आपली चेतना आपल्या परम अवस्थेमध्ये अशावेळी पोहोचू शकते, जेव्हा ती वर्तमानकाळामध्ये असते.हेच कारण आहे की अध्यात्माची सगळी साधने आपल्याला वर्तमानकाळातच प्रस्थापित करतात. योग, ज्ञान आणि भक्ती यांच्या क्षेत्रात ज्या ज्या विधी विकसित झाल्या आहेत, त्या सर्व आपल्याला वर्तमान क्षणामध्ये जगायला शिकवतात. आपण जसेही वर्तमानकाळात स्थापित होतो, तत्क्षणी आपले मन आनंदाने भरले जाते.शेवटी संताचे पहिले लक्षण आहे की जे नेहमी वर्तमानात राहतात. हेच कारण आहे की संताचे विचार पूर्णपणे कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय असतात. संताची वाणी आणि कृती पूर्णपणे पारमार्थिक आणि सर्वकालीन असते. ती कोणत्याही वर्ग अथवा काळाकरिता असत नाहीत.वर्तमानकाळामध्ये प्रस्थापित होण्यासाठी सर्वात सुगम आणि प्रभावी साधना ही श्वासाची असते. हा श्वास जन्मापासून मृत्यूपर्यंत चालत असतो. श्वासाचे चालू असणे हे सदैव वर्तमान काळातच होऊ शकते. शेवटी या श्वासास आपल्या चेतनेला जोडून आपण आपल्याला वर्तमानामध्ये स्थापित करू शकतो. शांत बसून निरपेक्ष भावाने श्वासाचे निरीक्षण केल्यावर मन हळूहळू भूत आणि भविष्यापासून दूर जाऊ लागते. मनामध्ये जे विचारकल्लोळ सतत उठत असतात, ते हळूहळू शांत होत जातात आणि आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते. जसजशी आपली चेतना वर्तमानात स्थित होत जाते, तसतसा संतपणाचा भाव आपल्या जीवनात येऊ लागतो आणि काही विशिष्ट लक्षणे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसू लागतात. सत्याकडे त्याची ओढ निर्माण होऊ लागते. तो अहिंसक आणि दुसºयांच्या धनलोभापासून मुक्त होत जातो. संग्रह करण्याची प्रवृत्ती समाप्त होते आणि तो आपल्या वासनांवर नियंत्रण ठेवू शकतो. मनाच्या शुद्धीबरोबरच त्याच्यात आनंद निर्माण होत जातो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक