शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संतांचा सहवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 05:03 IST

शूचीसंपन्न श्रीमंत घराण्यात जन्म हा फक्त योगभ्रष्ट पुण्यवान महापुरुषांनाच लाभतो, असे भगवंत आपल्या परमभक्ताला, म्हणजेच भक्तश्रेष्ठ अर्जुनाला मोठ्या प्रेमाने सांगतात.

- वामनराव देशपांडेशूचीसंपन्न श्रीमंत घराण्यात जन्म हा फक्त योगभ्रष्ट पुण्यवान महापुरुषांनाच लाभतो, असे भगवंत आपल्या परमभक्ताला, म्हणजेच भक्तश्रेष्ठ अर्जुनाला मोठ्या प्रेमाने सांगतात. कारण अर्जुन हा श्रेष्ठ साधक आहे. भोगविरहित आयुष्य जगणारा, प्रत्यक्ष भगवंतांच्या कृपाशीर्वादाला प्राप्त झालेला अर्जुन म्हणजे तर परमभक्तीचे परमोच्च शिखर होता. विवेक आणि वैराग्याचे मूर्त रूप होता. अर्जुनाची अनेक जन्मांची साधना होती, म्हणून स्वत: भगवंत आपल्या या अत्यंत श्रेष्ठ परमभक्ताचे संरक्षण कवच झाला होता. म्हणून भगवंत त्याला ज्ञानमयी योगभ्रष्ट महाभक्ताच्या मृत्यूनंतर तो योगभ्रष्ट आपली अपुरी राहिलेली साधना पूर्ण करून, कुठल्या महान कुळात अखेरचा जन्म घेऊन मोक्षपदावर आरूढ होतो, ते सांगतात,अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम।एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीद्दशम।।पार्था, हा जो योगभ्रष्ट असतो ना, तो अत्यंत वैराग्यसंपन्न, ज्ञानी ऋषीच्या कुळातच आपला अखेरचा जन्म घेऊन आपली अपुरी साधना पुर्ण करतो आणि परमेश्वराची प्राप्ती करून घेतो असा हा योगीकुळात जन्म होणे ही मानवी आयुष्यातली अत्यंत दुर्मीळ घटना आहे. पार्था, असा जन्म जो लाभतो, तो नि:संशयपणे दुर्लभ असतो. ही योगभ्रष्टांची गती तू समजून घे. मानवी देह प्राप्त होणे हीच एक दुर्लक्ष गोष्ट आहे. या मानवी जन्मात आपण स्वत: अथक साधनेच्या बळावर मोक्षाची प्राप्ती करून घ्यावी, अशी इच्छा बाळगणारी माणसे अत्यल्पच असतात. त्याचप्रमाणे, संतपुरुषांचा सहवास लाभणे हेसुद्धा अतिशय दुर्लभ आहे.