शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

सुखी माणसाचा सदरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 05:49 IST

आमच्या साधक लहानपणी मराठीच्या पाठ्यपुस्तकात एक सुंदर बोधकथा होती.

- प्रा. शिवाजीराव भुकेलेआमच्या साधक लहानपणी मराठीच्या पाठ्यपुस्तकात एक सुंदर बोधकथा होती. एक राजा दु:ख, वेदना, राज्यात चालणारे षड्यंत्र यांना कंटाळून गेला होता. राजवाड्यातून बाहेर काही अंतरावर खळखळत्या नदीचे पाणी पिऊन व सळसळत्या वृक्षाची पाने खाऊन हिरवळीच्या हिरव्यागार गालिच्यावर डेरेदार हिरव्याकंच्च वृक्षाखाली एक कलंदर कलाकार बासरी वाजवीत बसला होता. जीवनातल्या सुखाचे सारे सूर त्याच्या बासरीतून झरझरत होते. तेव्हा राजाला वाटले, हा माणूस सुखी आहे. याच्याकडून आपण सुखाचा सदरा मागून घेऊ. जवळ जाऊन पाहतो तो काय, अरे! या माणसाच्या अंगावर सदऱ्याचा पत्ताच नाही. डोक्यावर शिरस्त्राण अन् पायात पादत्राणही नाही. फक्तएक लंगोटी आणि लाकडाची एक बासरी एवढीच काय ती त्याची संपत्ती अन् तरीही तो राजाला संत तुकडोजी महाराजांच्या शब्दात उत्तर देत होता.पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे।शांती सदा वीराजे या झोपडीत माझ्या।।हे राजा! तुझ्या पायासी गजांतलक्ष्मी लोळण घेते. तुझ्याकडे सतरा-सतरा महाल आहेत. सुख उपभोगाच्या पाठीमागे लागून तू सदऱ्यांची संख्या एवढी वाढवलीस की, सदºयाचा रुबाब सांभाळण्यातच तुझे सारे दिवस खर्ची पडले. आयुष्य खर्ची पडले; पण मला एकही ‘सदरा’ नाही. तो सांभाळण्याची उठाठेव ही नाही अन् फाटला तर दु:खही नाही. कारण सुखी माणसाला सदराच नसतो. आपल्यासारखे दु:खी राजे मात्र कनक, कांता, कामिनी, कीर्तीचे ‘सदरे’ गोळा करण्यात एवढे व्यस्त आहेत की, आत्मसुखाच्या चिंध्या -चिंध्या होत आहेत. जीवघेण्या स्पर्धेत तोंडाला फेस येत आहे आणिआत्मसुखाचा सुखद वारा वाहत राहतो तो आमच्या बाजूने फिरकतसुद्धा नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक