शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

गरिबीची नेमकी कारणं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2019 04:19 IST

खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो.

- विजयराज बोधनकरएका प्रसिद्ध लेखकाला कार्यालयीन कामासाठी चुणचुणीत तरुणाची गरज असते. आपल्या प्राध्यापक मित्राला तो हे सांगतो. त्याच्या कॉलेजमध्ये एक गरीब विद्यार्थी असतो. त्याच्या वडिलांचा दारूमुळे मृत्यू झालेला असतो. आई घरकाम करून मुलांचे शिक्षण, घर चालवीत असते. प्राध्यापक त्या मुलाला लेखकाकडे पार्टटाइम नोकरीला पाठवतो. महिना-दीड महिना तो आनंदात काम करतो. गरीब मुलाला या कामातून चार पैसे मिळतात याचा आनंद लेखकाला होतो. लेखनाची आवड असलेला मुलगा अध्येमध्ये त्याने लिहिलेल्या कविता दाखवत असतो. याचा लेखकाला आनंद होतो, पण एक दिवस विचित्र घटना घडते.एके दिवशी मुलगा ऑफिस सुटल्यावर इमारतीखाली उतरतो. लेखकाचे घरही त्याच इमारतीत असते, लेखकाची बायको खिडकीतून बघते. मुलाच्या पाठीवरची बॅग जड सामानाने भरल्यासारखी वाटते. शंका आल्याने ती त्याला घरी बोलावते. बॅग तपासते तेव्हा त्यात ऑफिसमधली महागडी दहा-बारा पुस्तके आढळतात. कसून चौकशी केल्यानंतर तो सांगतो की, मी ही पुस्तके रद्दीत विकून पैसे मिळवतो. आतापर्यंत त्याने लेखकाच्या संग्रहातली बरीच पुस्तके विकलेली असतात. चोरी करून तो मोठा विश्वासघात करतो. त्याला कामावरून काढले जाते. ही बातमी कॉलेजमध्ये पसरते, त्याच्यावर चोर म्हणून शिक्का बसतो. प्राध्यापकाच्या मनातून तो कायमचा उतरतो. खरेतर, त्याला गरिबीतून वैचारिक आणि आर्थिक श्रीमंत होण्याची संधी प्राध्यापक देतात; पण त्याचे कुकर्म आडवे येते.यालाच ‘वैचारिक गरिबी’ म्हणतात. अशा घातक वृत्तीची गरिबी सतत पाठलाग करते. याचा दोष ही माणसे दैवाला देऊन मोकळी होतात. आयुष्यभर गरिबीच्या बाभुळीला खतपाणी घालतात. खोटे बोलणे, चोरी, उद्धट वागणे, अर्वाच्य बोलणे, दिलेला शब्द न पाळणे, जबाबदारी न स्वीकारणे, थोडक्यात समाधान मानणे अशा अनेक अवगुणांमुळे गरिबीचा उच्चांक वाढतच जातो.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक