शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्योदयाने पाच इंद्रियांची प्राप्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 17:10 IST

मानवाला पुण्योदयाने पाच इंद्रिये प्राप्त झालेली आहेत. त्यामध्ये कान, डोळे, नाक, जीभ व त्वचा सर्व इंद्रिये महत्वाची.

अहमदनगर : मानवाला पुण्योदयाने पाच इंद्रिये प्राप्त झालेली आहेत. त्यामध्ये कान, डोळे, नाक, जीभ व त्वचा सर्व इंद्रिये महत्वाची. पण त्यातल्या त्यात डोळ्यांना प्रमुख स्थान प्रदान केले आहे. डोळ्यांना सतत पाहण्याचे कार्य आहे. परंंतु एकदा जर भगवंताचे दर्शन केले तर डोळ्यांना अन्यत्र कोठेही शांती मिळणार नाही. ज्याने क्षीर समुद्राचे दूध प्राशन केले, त्याला समुद्राचे खारट पाणी पिण्याची इच्छा होत नाही. रत्नप्राप्ती झाल्यानंतर चमकणाऱ्या तुकड्यांकडे कोण आकर्षिक होईल. त्याचप्रमाणे कानांनी संतवचन ऐकल्यास कान पवित्र होतात. आपल्या जीवनाचा कायापालट होतो. आम्रपाली राजनर्तकी असूनही एकदा भगवान बुध्दांची वाणी ऐकली. जीवनात अमूल्य परिवर्तन झाले. संत सौम्यमूर्ती पाहूनच अभिभूत होतात. म्हणतात.. आकृती गुणान्कथयती, चेहरा पाहूनच व्यक्तीच्या गुणांची कल्पना येते. सौम्यता चार प्रकारची सांगितलेली आहे. आकृतीची सौम्यता : चेहरा जर सौम्य असेल तर ती व्यक्ती सर्वप्रीय बनू शकते. जसे श्रेणिक महाराज वनभ्रमणासाठी निघाले असताना उद्यानामध्ये संत दिसतात. त्यांचा शांत, सौम्य चेहरा पाहून आश्चर्यचकीत होतात. स्वभावाची सौम्यता : स्वभावात सौम्यता असावी. उर्मटपणा वा उग्रता नसावी. सौम्य स्वभाव असेल तर सगळे आपले बनू शकतात. वाणीची सौम्यता : मुखातही वाणीची सौम्यता म्हणजे गोडवा असावा. गोडवा असेल तर शत्रुही आपले मित्र बनतात. कटूता असेल तर आपले स्वजन, मित्र सुध्दा शत्रू बनू शकतात. विचारांची सौम्यता : विचारांची सौम्यता म्हणजे सगळ्यांबद्दल मनात शुभविचार असावेत. सर्वांच्या कल्याणाची, कुशलक्षेत्राची भावना असावी. विचार शुध्द असतील तर आपले वर्तनही सौम्य बनेल.- साध्वी सन्मतीजी महाराज.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर