शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

तीर्थक्षेत्र ज्ञानमय ऊर्जाक्षेत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 13:55 IST

तीर्थ आणि क्षेत्र निर्माण करण्याचे सामर्थ्य फक्त देव आणि संत यांच्याच ठिकाणी आहे.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजतीर्थ आणि क्षेत्र निर्माण करण्याचे सामर्थ्य फक्त देव आणि संत यांच्याच ठिकाणी आहे. तीर्थक्षेत्रात आपल्याला प्रेरणा मिळते. तीर्थक्षेत्र ही ज्ञानक्षेत्र आहेत. तीर्थाला गेल्याने प्रथमत: पर्यटन घडते. वातावरणात बदल होतो. वातावरणातील बदलामुळे मनाची स्पंदने बदलतात. मनाच्या आरोग्यामुळे स्वत:चे आरोग्य निरोगी बनते. मनाची स्पंदने सात्त्विक बनतात. तीर्थात लोक स्नान करतात. कारण तेथील ऊर्जात्मक स्पंदने मनावर आघात करतात. सकारात्मकता निर्माण होते. तीर्थावर गेल्यास तेथील घंटा-शंख इत्यादींचा जो ध्वनी निर्माण होतो, चैतन्य लहरी निर्माण होऊन त्याचा हवेवर परिणाम होऊन मनुष्याला आत्मविश्वासाने जगण्यास मदत करतो. भारतीय परंपरेत तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे मनाची बॅटरी चार्ज करण्याचे ठिकाण. तीर्थक्षेत्र ही मनुष्याला सद्गुणी बनवतात. सात्त्विक जगण्यासाठी ती प्रेरणादायक ठरतात. मनाची अवस्था सतत बदलत असते. मन चांगले नसेल तर तीर्थावर जाऊनही मनाची मलिनता जात नाही. फक्त निर्मल, स्वच्छ हवा आपल्या अंगावर आदळते. त्याचा परिणाम शरीरासह मनावर होतो. काही दिवस तीर्थावर राहिलो तरी मन बदलत नाही. त्यासाठी मनाची अवस्था फार महत्त्वाची आहे. मनाची चंचलता घालवण्यासाठी साधन म्हणून तीर्थक्षेत्राचा आधार घेता येतो. तीर्थक्षेत्र मनाची मलिनता दूर करतात; परंतु तेवढी दर्जेदार तीर्थक्षेत्र असावी लागतात. आजकाल लोक कोणत्याही स्थानाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देतात. देवाचे अस्तित्व व संतांची तपश्चर्या असलेली ठिकाणे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखली जातात. तीर्थक्षेत्र कोणत्या स्थानाला म्हणावे, तेथील ऊर्जा किती आहे, तेथे गेल्यावर तुमच्या मनाचे भाव बदलतात का? मनाची स्थिती तेथे बदलल्यास समजावे - येथे सात्त्विक ऊर्जास्पंदने खूप आहेत. ती ऊर्जात्मक शक्ती मनावर प्रभाव टाकीत असते. दुराचारी माणसालाही त्याचा अनुभव येतो. अनुभवाने सांगतो, मनाची परिपक्वता, मनाची स्थिती, गती याचाही परिणाम तीर्थक्षेत्रावर होतो. तीर्थक्षेत्र ज्ञानमय ऊर्जाक्षेत्र आहेत. म्हणून ज्ञानदेव म्हणतात,तीर्थयात्रा जाया चुकू नको।ठेवा आपले देह हे सुद्धा क्षेत्र बनेल।।(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक