शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

परमात्मा झाला बहुरूपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 02:35 IST

भागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना.

- डॉ. रामचंद्र देखणेभागवत हा भक्तिसंप्रदायाचा आत्मा आहे. भागवताने लीलासंकीर्तन घडवून भक्तीला आविष्काराच्या पातळीवर आणले आहे. हजारो श्लोकांचे महाभारत, पुराण रचूनही व्यासांच्या मनाला शांती लाभेना. केवळ शास्त्रार्थाचा आणि तत्त्वचिंतनाचा उहापोह केला तरी भगवंताचे भावपूर्ण गुणगायन झाल्याखेरीज समाधान मिळणार नाही. हे नारदांंनी सांगितले आणि व्यासांनी भक्तिरसप्रधान, लालित्यपूर्ण भाषेतील रसाळ लीलादर्शी भागवत लिहिले. त्यात भगवंताच्या लीला असल्यामुळे त्याला आपोआपच नाट्यमयता लाभली. तेच भागवत संकीर्तनातून अधिक लोकाभिमुख झाले आणि त्याच लीला दशावतार, भारुड, गौळणी, नौटंकी, शैव नाटक, भरतनाट्यम्, वैष्णव नाटक, कीर्तनिया अशी रूपे घेऊन अविष्कृत होऊ लागले. त्यातूनच पुढे प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या लोककला जन्माला आल्या.मराठी लोककलेचे हे स्वरूप पाहता किमान हजार ते बाराशे वर्षांची परंपरा या लोककलांना लाभली आहे. मूळ परंपरेचा बाज तसाच ठेवत कालमानाप्रमाणे त्यात बदल करीत या लोककलावंतांनी हजारो वर्षे लोकरंजन घडविले आहे. लोकधर्म जागविला आहे आणि प्रबोधनही केले आहे.मध्ययुगीन भक्त कवींनी भक्तीच्या अभिव्यक्तीसाठी आणि लोककलावंतांनी लोकदेवतेचे भक्तिरूप मांडण्यासाठी लोकछंदांचा, लोकगीतांचा, लोककथांचा, लोकपुराणांचा आणि लोकधारणांचा स्वीकार करून प्रयोगात्मक लोककलांचा प्रभावी वापर करून कथन-नाट्याची निर्मिती केली. अशा कथननाट्याचे मराठी भूमीतील अस्सल मराठमोळे रूप म्हणजे कीर्तनाचे आख्यान; हेच आख्यान जागरण-गोंधळीतील विधिनाट्याच्या रूपात या मातीच्या लोकरंगभूमीत रुजले.उत्तर पेशवाईतल्या तमाशात वगनाट्य नव्हते. सन १८६५ च्या सुमारास शाहीर ‘उमा-बाबू’ या मातंग समाजातील गुराखी पोराने विष्णुदास भाव्यांचे सांगलीतील नाटक पाहून असे कथानक तमाशात का नसावे, असा विचार करून ‘मोहना-बटाव’ हा पहिला वग लिहिला आणि त्यानंतर तमाशात ‘वग’ सादर होऊ लागला. पुढे तमाशाचे रूपांतर लोकनाट्यात झाले.महाराष्ट्राच्या भूमीत विविध ठिकाणी या लोककला उदयास आल्या आणि महाराष्ट्रभर सादर होऊ लागल्या.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक