शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

विकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 02:41 IST

माझ्या माहितीतले एक वयस्कर असे हार्ट अटॅक येऊन गेलेले गृहस्थ आहेत. ते अविवाहित असल्यामुळे, एका छोटयाश्या खोलीत एकटेच राहत असतात मात्र नेहमी आनंदीत दिसतात. मी त्यांना विचारले की तुम्ही नेहमी आनंदीत कसे काय रहाता?

- प्रा.डॉ. संदीप ताटेवार

माझ्या माहितीतले एक वयस्कर असे हार्ट अटॅक येऊन गेलेले गृहस्थ आहेत. ते अविवाहित असल्यामुळे, एका छोटयाश्या खोलीत एकटेच राहत असतात मात्र नेहमी आनंदीत दिसतात. मी त्यांना विचारले की तुम्ही नेहमी आनंदीत कसे काय रहाता? तर ते म्हणाले जीवन जगात असतांना मी असा विचार करतो की जीवनातला प्रत्येक क्षण आहे त्या परिस्थितीत आपण आनंदानी जगू शकतो किवा दु:खानी ! या दोन विकल्पांपैकी मी आनंदानी जगण्याचा विकल्प प्रत्येक वेळी स्वीकारत असतो. अमतिाभ बच्चन यांच्या ‘‘ कौन बनेगा करोडपती ’’ या दूरदर्शन मालिकेत प्रत्येक प्रश्नाला चार विकल्प दिलेले असतात. जो स्पर्धक प्रत्येक प्रश्नाला योग्य विकल्प निवडत जातो तोच शेवटी करोडपती बनतो तसेच जो संकटकाळी योग्य लाईफ लाईनचा विकल्प निवडतो तोच अचूक उत्तर देऊ शकतो. आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या जवळ विकल्प उपलब्ध असतात. कोणी आपल्याला शिवीगाळ केली तर ढोबळमानाने दोन विकल्प. एकतर आपण त्याच्या प्रमाणेच शिवीगाळ करू शकतो किंवा स्वत:ला त्रास न करता शांतपणे समजावून सांगू शकतो. जीवनात कोणतेही संकट आले तर पुन्हा ढोबळमानाने दोन विकल्प असतात . संकटाला शांतपणे स्वीकारून धैर्याने तोंड देऊ शकतो किंवा स्वत: अिस्थर होऊन भीतीने तोंड देऊ शकतो. पिहल्या विकल्पामुळे आपण परिस्थितीवर मात करू शकतो तर दुसर्या विकल्पामुळे परिस्थिती आपल्यावर मात करू शकते.प्रत्येक परिस्थितीमध्ये आपल्या जवळ विकल्प उपलब्ध असून सुद्धा बरेचदा आपण बुद्धिला उपलब्ध विकल्पावर काम करू देत नाही. आपल्या बुद्धिमध्ये कोणता विकल्प निवडायचा व कां निवडायचा याचे द्वंद चालू असते मात्र आपण उपलब्ध विकल्पावर विचार न करता आपल्या स्वभावानुसार बरेचदा निर्णय घेत असतो मग आपला स्वभाव व संस्कार चांगले तर कार्य चांगले! प्रत्येक परिस्थितीमध्ये कोणता विकल्प निवडायचा हे आपल्या ज्ञानावर, विचारांवर, संस्कारांवर व स्वभावावर अवलंबून असते. जेव्हा आपण प्रत्येक परिस्थिती मध्ये आपले मन शांत ठेवतो, विविध उपलब्ध विकल्पावर सखोल विचार करतो, योग्य विकल्प निवडतो व पूर्ण शक्तीने अंमलात आणतो. तेंव्हाच यश प्राप्त होत असते.

टॅग्स :spiritualअध्यात्मिक